Posts

Showing posts from November, 2018
Image
समाजाविषयी साहित्यिकाची भूमिका कोणतेही साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यात समाजाचे चांगले वाईट प्रतिबिंब दिसत असते. साहित्यिक आपल्या साहित्यातून समाजासमोरील असलेल्या विविध आर्थिक, सामाजिक, धार्मिक, लैगींकभेद अशा प्रश्नांवर भाष्य करत असतो. नुसते आपल्या साहित्यातून समाजाचे मनोरंजन करणे एवढेच काम साहित्यिकाचे नसते तर त्याच्या साहित्यातून समाजाला योग्य अशी दिशा मिळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्या लेखणीतून समाजामधील ज्वलंत प्रश्नावर आसूड ओढण्याचे काम साहित्यिकाने करणे गरजेचे असते. साहित्यिकाने कोणत्याही एका पक्षाची, धर्माशी, मताची, प्रवाहाची बाजू न घेता समाजात जे काही चांगले घडत आहे त्याच्या पुरस्कार करणे त्याला प्रोत्साहन देणे, त्याला बळ देणे व तसेच जे काही निरपेक्षपणे, तटस्थ भूमिकेतून करणे गरजेचे आहे तरच त्याच्या साहित्याला एक वजन प्राप्त होईल. साहित्यिकाने प्रस्थापितांचे लांगुलचालण न करता आपले विचार प्रखरपणे मांडणे गरजेचे आहे. साहित्यिकाच्या लेखणाचा थाक सत्ताधा-यांना वाटणे गरजेचे असते. त्याच्या मनात समाजाविषयी कणव असणे गरजेचे आहे. साहित्यिकाने प्रसिध्दीच्या पाठी न लागता समाज...
Image
हायकू कविता तू उदास मीही उदास प्रेमाचे  दास ************* धावून धावून आता मी थकलो थोडाच मी उरलो ************* तूला पाहिल्यापासून माझा मी ना उरलो हरवून गेलो ************* तू म्हणतेस माझ्यात काय पाहिलं हेच नाही उमजलं ************** बायको तुमची अन माझी सारखीच असते दुमत नसते ************** तुझ्या साथीने जग मी जिंकेन नाही काही होत एकटयाने ******************** तुझी साथ हवीहवीशी कुठे शिंकली  माशी ************** साथ माझी सोडू तू नकोस प्रेमाचा तास ************* प्रेमात व्यवहार नको स्वप्न थाटात ************ तू गेलीस मी राहिलो तिथे तू भेटली जिथे ************* ©  महेश भा. रायखेलकर
Image
किंमत शून्य  माझ्या धडपडीची किंमत शून्य माझ्या प्रयत्नांची किंमत शून्य माझ्या प्रेमाची किंमत शून्य माझ्या मायेची किंमत शून्य माझ्या मैत्रीची किंमत शून्य माझ्या नात्याची किंमत शून्य माझ्या सहानुभूतीची किंमत शून्य माझ्या चांगुलपणाची किंमत शून्य माझ्या परोपकाराची किंमत शून्य माझ्या भक्तीची किंमत शून्य माझ्या त्यागाची किंमत शून्य माझ्या नीतिमूल्यांची किंमत शून्य माझ्या दुःखाची किंमत शून्य माझ्या आनंदाची किंमत शून्य माझ्या ज्ञानाची किंमत शून्य माझ्या शक्तीची किंमत शून्य माझ्या युक्तीची किंमत शून्य माझ्या सेवेची किंमत शून्य माझ्या सांगण्याची किंमत शून्य माझ्या बोलण्याची किंमत शून्य माझ्या सल्ल्लाची किंमत शून्य माझ्या कष्टाची किंमत शून्य माझ्या वयाची किंमत शून्य माझ्या पदाची किंमत शून्य माझ्या पुण्यांची  किंमत शून्य माझ्या विजयाची किंमत शून्य माझ्या तळमळीची किंमत शून्य शेवटी माझ्या लेखणीची किंमत शून्य ©  महेश भा. रायखेलकर
Image
तो भारत माझा क्रांतीवीर  जिथे गेले फासावरती, पवित्र आहे जिथली माती, तो भारत  माझा!  तिरंगा फडके जिथे डौलात, संत जन्मले ज्या   भूमीत, तो भारत  माझा!  पृथ्वीला जो  कुटूंब मानतो, जगाला मानवतेचा संदेश जो   देतो, तो भारत  माझा! सर्व धर्माचा जिथे  आदर, ज्ञानाचे जिथे  समृद्ध भांडार, तो भारत  माझा!  जन-गण -मन जिथे  प्रत्येक मनात, संस्कृती जिथे  पुजतात, तो भारत  माझा! पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा  जिथे, हसत हसत प्राण द्यावा तिथे, तो भारत  माझा! तो भारत  माझा! (महेश भा. रायखेलकर)
Image
हायकू कविता गरज आहे म्हणून मला विचारतो तुला ************ काहीही करून ते कर नको हार ************** स्वतःचेच तू खरं करतेस कुठे ऐकतेस ************* कोण तू मला सांगणार नाही ऐकणार ************* मी नाही तर कोण करणार तू माझी होणार ************* तूच सांग कसं वागू तुला लागू ************ तूच कर माझा विचार भावनेचा भार ************* असतेस ऐकलं जर माझं झालं असत भलं ************* जगात मीच तुला सापडलो वेडा झालो ************ महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू इथवर दिलीस मला तू साथ थोडी कळ सोस --------------- जाता जाता हे काय केलंस मारल्या बाता ------------- घराचं बजेट बायको ठरवते मला विचारते --------------- नाही पसंद मला तुझ्या सवई उगीच केली घाई ---------------- बस माझ्याजवळ तू निवांत हो शांत ----------------- मी पुढे तू मागे नको आढेवेढे --------------- दिली नाहीस तू मला कल्पना तू जातांना ---------------- मनात राहिली माझ्या रुखरुख तुझे सुख ---------------- कोणताही जीव आहे अनमोल देवाचे फुल ---------------- माणसे तोंडावर  नाही   बोलत  माघारी नाही सोडत --------------------            ©  महेश भा. रायखेलकर
Image
देवाची पूजा मी माझे काम अगदी प्रामाणिकपणे  करतो मी  आई-वडिलांची  मनोभावे सेवा करतो म्हणजेच मी देवाची पूजा करतो ! मी समाजातील वंचितांचे अश्रू पुसतो मी निसर्गावर भरभरून  प्रेम करतो म्हणजेच मी देवाची पूजा करतो ! मी देशातील कायदे काटेकोरपणे पाळतो मी स्त्रियांना उचीत  सन्मान देतो म्हणजेच मी देवाची पूजा करतो ! मी प्रसंगी देशासाठी प्राण देण्यास तयार असतो मी जात-धर्माच्या उभ्या  रेषा मारत नाही म्हणजेच मी देवाची पूजा करतो ! मी पूजा-अर्चा, उपास-तापास अश्या कर्म कांडात पडत  नसतो म्हणून मी काय नास्तीक ठरतो ? महेश भा. रायखेलकर
Image
घोटाळे घोटाळे घोटाळे खंडीभर घोटाळे देशाचे केले यांनी पुरते वाटोळे काल कोणी मल्ल्या आज कोणी मोदी करून घेतली यांनी  स्वतःची चांगली चांदी सामान्यांना कर्ज देतांना बँका येती आड यांच्यासाठी बँकांची तिजोरी उघड, सताड कोणाचेही असुदे देशात सरकार परदेशी होती बिनबोभाट हे  पसार जनता भरती प्रामाणिकपणे कर हे लबाड होती चोरावर मोर कायदा व्यवस्थेचे नसे यांना कोणतेही भय बगलबच्चांनी  करून ठेवलीय सर्व यांची सोय आणा यांना फरपडत विदेशातून देशात टाका आजन्म या सर्वांना  बंद कोठडीत फिरवा यांच्या संपत्तीवर पुरता वरवंटा देशाची केली यांनी क्रूर चेष्टा कायदा व्यवस्था करावी अशी कडक गुन्हे करण्याआधीच  बसावा त्याचा धाक जनतेने ना बसावे नुसते थंडगार आवाज उठवून हादरून टाकावे   सरकार शत्रुंना मारण्यास सज्ज सैनिक सीमेवर देशातील चोरांना दयावा जनतेने मार केले आपण आजपर्यंत खूप काही सहन सगळे मिळून वाढवूया देशाची शान ©  महेश भा. रायखेलकर