Posts

Showing posts from September, 2018
Image
काही हायकू आहेत सगळ्यांच्या आपल्यावरच नजरा सांग कसा देवू  गजरा ***************** तुलाही काही सांगायचंय मलाही काही सांगायचंय कोण ऐकायाचंय ***************** संकटे सांगून येत नाहीत नाही हाकलता  येत **************** सुख वाटावे दुःख ठेवावे असे वागावे ************** अपमानाची धग कायम असते शरीर जाळते ************* स्त्री शक्तीचा करा सन्मान द्या मान ************ अन्नाची नासाडी करू नका उपासमार गाडी ************* आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा कष्टाची कास धरा ***************** भूक काहीही करायला लावते वाट काहींची भरकटते ***************** प्रामाणिकपणा कोठेही कामाला येतो माणूस उठून दिसतो ***************** ©  महेश भा.रायखेलकर
Image
काही हायकू सज्जन येत नाहीत  एकत्र दुर्जन मित्र ========== ज्याला जे पाहिजे ते मिळू दे माझे राहूदे ============ मनाला काबूत ठेवावे म्हातारपणी सांगावे ============= फुकटला सल्ला देवू नये भरावा गल्ला ============ पाणी वाचवा पाणी जिरवा मग मिरवा =========== कधीतरी बायकोला करून द्या चहा प्रेमाचा मामला ============= मेव्हणीचे फार कौतुक करू नये बायको समोर ============= चोरीचा मामला मामाही थांबला मामीने चोपला ============= लग्नानंतर माणूस बनतो  काटकसरी बायको बसते उरी ============= लग्नानंतर हनिमूनला जरूर जावे टोमणे खावे ================ ©  महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता कौतुकाने गर्विष्ठ होवू  नका होईल टिका =============== जन्म मृत्यू न आपल्या हाती शेवटी माती =============== काम, क्रोध, मत्सर ठेवावे बाजूला बनावे चांगला =============== चेष्टा व कुचेष्टा मध्ये अंतर असते नको जीवघेणी थट्टा ============== सण साजरे करूया पर्यावरणाचा मान राखून निसर्ग जाईल कोपून ================ माफ करतांना नसावा मनात किंतु बदला घेण्याचा वळू नये जंतू ================== काळ वेळ पाहून बोलावे न व्हावे वाचाळ ================== वेळ सत्कारणी सतत लावावा न वाया जावू दयावा ================= करण्यासारखे आहे बरेच काही का तू वाट पाही ================= दुस-याची बायको सुंदर दिसते लग्नानंतर कळते ================== ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू परत परत वळून पाहतेस आणि म्हणे जातेस **************** सरस्वती श्रीमंतांच्या घरी पाणी भरते तिलाही पोट असते ***************** श्रीमंत माणूस ज्ञानी असेलच असे नाही पैसाने विकत घेतो काहीही ********************* पैसा कमवावा लागतो फुकट ना मिळतो ******************* पैसासाठी माणूस काहीही करायला तयार मांडलाय बाजार ******************* पैसाने सुख विकत घेता येतं दुःख विकता  येतं ***************** पैसाचे मोल येथे फार सारेच लाचार *************** सुख दुःख ऊन पाऊस रात्र दिवस **************** करावे तसे भरावेच लागते ना ते चुकते *************** भूक  गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही सर्वजण एकाच जात्यात ******************* ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू रामालाही वनवास चुकला नाही आपण कोण खास +++++++++++++ डोक्यावर पांघरून घेवून झोपी गेलो घोरायला लागलो +++++++++++++ अकलेचे तारे तोडू नका हसतील सारे +++++++++++++ नोकरी -धंदा सांभाळून छंद करा नाहीतर उपाशी मरा ++++++++++++++ ती तिच्या संसारात चांगलीच रमलीय मी आठवणीत तिच्या ++++++++++++++++++ कौतुकाने माणूस शेफारून जातो काहीही बडबडतो ++++++++++++++++++ माणसापेक्षा कधीकधी  जनावरे शिस्तीत चालतात अपघात ना करतात ++++++++++++++++ राजकारण म्हणजे पैसे कमवण्याचा धंदा मी उभारलोय यंदा +++++++++++++++ बायकोचे मत जरुर ऐकावे मनाला येईल ते करावे ++++++++++++++++ लग्नांनंतरचे काही दिवस चांगले असतात असे नंतर म्हणतात +++++++++++++++ ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू आपण खूप नियोजन करतो नसीब बिघवडतो +++++++++++ नवं वर्ष नवा उत्साह नवा हर्ष ++++++++++++  उत्साहाने कामाला सुरवात करा निरूत्साह नाही बरा +++++++++++++ स्वप्ने दुस-याला न सांगावीत पूर्ण करून दाखवावीत ++++++++++++++ पहिले स्वतः करून पहावे मग दुस-याला सांगावे ++++++++++++++ संकल्प करा सिद्धीस न्या संयम धरा +++++++++++++ शुभेच्छा द्यायला संकोच नको बिन  पैसाचा मामला ++++++++++++ राजाघरी रोजच दिवाळी गरीबाची गुपचिळी +++++++++++++ लहान मुलांवर हात उगारु नका नाजूक फुलपाखरं +++++++++++++ चांगले दिसण्यावर भर दिल्यापेक्षा लक्ष द्या चांगले असण्यावर +++++++++++++++++++ © महेश भा. रायखेलकर 
Image
हायकू काही श्रद्धेचा बाजार भक्तजन फार देव लाचार =========== देव देवळात यांनी कोंडला भक्त रडला ============= देवाच्यापायी ठेवतो तो डोके बाहेर धोके ============== तुझ्या हाताला मेहंदी  लागली जाग आली मला ============== तू झालीस परक्या घरची  का असं  केलंस ============== झेलले घाव खूप झालो निबर संकटांचा ताप ============== नवरा-बायकोच्या भांडणात कोणी पडू नये बसेल थोबाडात =================== लक्ष्मी-नारायणा सारखा दिसतो जोडा शालजोडीत हाणा ================= लग्न झाले कि मित्र दुरावतात बायकोशी मैत्री करतात ================== मैत्रीण आणि बायको मध्ये फरक असतो अविवाहित सांगतो ================== © महेश भा. रायखेलकर 
Image
हायकू कविता तंत्रज्ञानाने दूरचा जवळ आला जवळचा जिवंत का मेला ================= मनातले कोणालातरी सांगावेसे वाटते कोण ऐकते ============== थोडावेळ तरी स्वतःशी बोला मग बोंबला ============= तुझ्या माझ्या मनाच्या जुळल्या तारा का भांडतेस तरातरा ================ प्रेमाचं माणूस जवळ असावं मग पहावं ============== माणूस पैसे कमवण्यासाठी धाव धाव धावतो दवाखान्याचे बील भरतो ================== माणसाच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत होतील स्वर्गात =================== त्याच त्याच चुका करू नका यशाला धोका ================== हरलात म्हणजे नाही संपलात करा नव्याने सुरवात ================ आलेली संधी नका दवडू अपयश कडू ================ ©  महेश भा. रायखेलकर