काही हायकू
माणूस मोठमोठ्या गोष्टीत
आनंद शोधतो
आयुष्यभर दुःखी रहातो
++++++++++++++++++
वेळ आल्याशिवाय
काही साध्य होत नाही
संयमास नसे तरणोपाय
++++++++++++++++++
काही होत नाही नुसते
विचार चांगले वाचून
जीवनात उतरवा आचरणातून
++++++++++++++++++++
तेच तेच करून काही
वेगळे कसे होणार
वेगळं काही करावं लागणार
+++++++++++++++++++
संकल्प आणि सिद्धी
यात खूप अंतर असते
काहींचे हवेतच विरते
++++++++++++++++++++
माणूस जगाला धोका
देवू शकतो
स्वतःपासून कोठे पळतो
+++++++++++++++++++
बायकोला सतत गृहीत
धरू नका
टाकेल कात
++++++++++++++++++
लवकर झोपा
लवकर उठा
हाणा कमी गप्पा
++++++++++++++++++
लहान मुलांना मोबाईल
पासून दूर ठेवा
आपल्यासारखंच वाया जातील
+++++++++++++++++++++
उगाच दिवस
मोजत बसू नका
नंतरचा शोक फक्त चौदा दिवस
+++++++++++++++++++++++++
महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment