हायकू कविता
दिसणं सुंदर
छान
मनात घाण
=========
कोणी कोणाला
कमी लेखू नये
प्रत्येक जीव अनमोल
=============
तू तुझ्याच
तो-यात
मी अडकित्यात
============
जा अशी
फसवू नको
डाव मोडू नको
==========
तुझ्या बरोबर
रंगला संसार
जीवनी आनंद फार
============
उगाच ताठ
वागू नये
फुटणार कधीतरी माठ
==============
तुला कळल्या का
माझ्या भावना
सांग ना
============
जे मनात
तेच ओठात
भरडलो जात्यात
============
तरुण पण
एकदाच येतं
नंतर म्हातारं होतं
===========
तूझे तारुण्य
मखमली
गालावर लाली
===========
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment