गुरु एक 'श्रद्धास्थान '
गुरुविणा कोण दाखवील वाट
गुरुविणा कशी होईल पहाट !
गुरु असे दिशादर्शक
जीवनाचा एक मार्गदर्शक!
गुरु करी चांगले संस्कार
दगडास देई मूर्तीचा आकार !
गुरुविणा कोण देईल आधार
शिष्याचा वाहील कोण भार !
गुरुविणा कोण घेईल परीक्षा
चुकल्यास कोण देईल शिक्षा !
शिष्याच्या यशात गुरुचे यश
उभा खंबीर जरी आले अपयश !
गुरुविणा कसा ज्ञानसागर पार
शिष्यास दाखवेल कोण पैलतीर !
गुरुचा वर्णावा किती महिमा
परब्रम्हांची त्यास उपमा !
गुरु असे माझे श्रद्धास्थान
सदाच मी त्यांच्यासमोर लीन !
गुरुचा वाढतो सन्मान
पाहून शिष्याची यशाची कमान !
पाहून शिष्याची यशाची कमान!!

Comments
Post a Comment