व्हॅलेंटाईन डे स्पेशल हायकू 

तूला पाहून
वाढे हृद्यायची धडधड
नको ती धडपड
=============
जाते म्हणतेस जा
मी कोठे आडवतोय
पण तुझा पाय कोठे निघतोय
===================
कशाला पाहतेस
तुझे सौदंर्य आरशात
पहा माझ्या चेह-यात
===============
हातात हात गुंफूनि
चालू जीवनाची वाट
बिनभोभाट
==============
तुझी अन माझी
जोडी जमली
इतर मेली
 ==============
माझे सुख घे तूला
तुझे दुःख दे मला
प्रेमाचा मामला
============
तुझ्या प्रेमात
मी हवेत
तू नशेत
===========
तुझी सोबत
मी निर्धास्त
विश्वास जास्त
==========
पाहून तुझ्या
गालावरचा तीळ
मारतो मी शीळ
============
पाहून तुझा
साज श्रुंगार
झालो मी गार
==========

© महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog