हायकू कविता

तुझ्या प्रेमात
वेडा मी झालो
शहाणपण विसरलो
=============
तूला पहाताच
प्रेमात मी पडलो
वहातच गेलो
===========
प्रेमात माणूस
अंधळा होतो
खड्ड्यात जातो
==========
आपल्यातील प्रश्नाला
प्रेम हेच उत्तर
नको करुस निरुत्तर
============
कोणी कोणाचे
जेव्हा ऐकत नाही
उत्तर नसे प्रश्नाचे
===========
तुझा रुसवा
मी काढेल
सांगेल ते ऐकेल
===========
तू अशी
जवळ येतेस
दूरचे पहातेस
=========
प्रेमाची किंमत
करता येत नाही
पैसे लागतात खिशात
==============
नको अशी
होवूस अधीर
थोडा धर धीर
============
श्रीमंतांचे प्रेम
होते सफल
गरिबांचे असफल
============


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog