आई

आई म्हणजे असते आपल्यातील ईश्वर
मूल  पहिल्यांदा बोले  `आई ' हेच अक्षर !

आई म्हणजे असते मायेचे अंथरुण
विसावासाठीचे ते एक उबदार पांघरुण  !

आई म्हणजे असते  दुधावरची साय
कोणी  म्हणे तिला माउली, तर कोणी माय!

आईच्या हातचे कोणतेही अन्न
जिभेला लागे जसे ते पक्वान्न  !

आई जेव्हा फीरवे पाठीवरुन हात
शीण सारा जाई विसरून एका क्षणात!

आईच्या आशीर्वादात एवढी  ताकद
कोणत्याही संकटावर मूल सहज करी मात!

आईचे  मुलावर  प्रेम   निरागस
जसे हरणिचे  निष्पाप पाडस !

आईला वाटे  आपलं मूल सदाच छोटं
जरी ते झाले कितीही मोठं  !

आई जरी असली आपल्यापासून दूर
तिची  नजर सतत आपल्या पिंल्लावर!

आईच्या पोटी जन्म घेई साक्षात विधाता
तिला पूजण्यास तोहि माने धन्यता !



महेश भा.  रायखेलकर 


Comments

Popular posts from this blog