पहा एकदा
सकाळची कोवळी किरणे
पौर्णिमेचे टिपूर चांदणे
पहा एकदा !
फुलांची नाजुक कळी
गुरांच्या चरणा-या फळी
पहा एकदा !
सकाळची कोवळी किरणे
पौर्णिमेचे टिपूर चांदणे
पहा एकदा !
फुलांची नाजुक कळी
गुरांच्या चरणा-या फळी
पहा एकदा !
पावसाच्या पडणा-या सरी
सांजवेळी सुर्य जातांना घरी
पहा एकदा !
अभाळी उडणारे पक्षी
दारातील रांगोळीची नक्षी
पहा एकदा !
अंगणातील फुलांचा सडा
फळांनी लखडलेल्या झाडा
पहा एकदा !
खळखळ वाहणारी नदी
पक्षांच्या घरट्यांच्या फांदी
पहा एकदा !
चमचम चमकणारे काजवे
आकाशातील तारकांचे दिवे
पहा एकदा !
हिरवेगार झालेले डोगर
धुक्यानी दाटलेला परीसर
पहा एकदा !
नभीच्या इंद्रधनुचे सप्तरंग
विटेवरील उभा पांडुरंग
पहा एकदा !, पहा एकदा !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment