असे का व्हावे ?
यात्रेच्या वाटेवरुनीच
कोणी देवाघरी जावे
असे का व्हावे?
जीवन सुरु होण्या आधीच
कोणाचे संपुनि जावे
असे का व्हावे?
कळी फुलण्या आधीच
कोणी निर्दयी खुरडावे
असे का व्हावे?
प्रियसीच्या विरहाच्या दुःखात
कोणी स्वतःला संपवावे
असे का व्हावे?
कोणी तरणेबांड पोरं
अपघाती मरुनी जावे
असे का व्हावे?
नवरा-बायकोच्या जोडीतून
कोणी एक अकाली जावे
असे का व्हावे?
असे का व्हावे? असे का व्हावे?
याचे उत्तर देवाकडेच असावे
देवाकडेच असावे
©महेश भा. रायखेलकर
यात्रेच्या वाटेवरुनीच
कोणी देवाघरी जावे
असे का व्हावे?
जीवन सुरु होण्या आधीच
कोणाचे संपुनि जावे
असे का व्हावे?
कळी फुलण्या आधीच
कोणी निर्दयी खुरडावे
असे का व्हावे?
प्रियसीच्या विरहाच्या दुःखात
कोणी स्वतःला संपवावे
असे का व्हावे?
कोणी तरणेबांड पोरं
अपघाती मरुनी जावे
असे का व्हावे?
नवरा-बायकोच्या जोडीतून
कोणी एक अकाली जावे
असे का व्हावे?
असे का व्हावे? असे का व्हावे?
याचे उत्तर देवाकडेच असावे
देवाकडेच असावे
©महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment