Posts

Showing posts from January, 2018
Image
रागाचे व्यवस्थापन  ‘ मी फार रागीट आहे !’. ‘मला फार लवकर राग येतो !’. ‘त्या परिस्थितीत मी रागावयचं नव्हतं तर काय करायचं होतं?’. ‘मी रागवू नको तर काय करू?. ‘रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’. या सारखी वाक्य बोलून प्रत्येकजण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानीकारक आहे हे एकाद्यावेळेस माहित असूनसुध्दा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही. रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागवता देखील आपण आपले जीवन जगू शकतो. ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम माणसास राग का येतो?. त्या मागची कारणीमिमांसा जर आपण नीट समजुन घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जावू शकेल. माणसाला राग खालील काही कारणामूळे येतो. १. माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो. २. आपण इतर लोकांबद्द्ल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहीजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहीजे?. पण प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रत...
Image
हायकू कविता  सुरात सूर तुझ्या मिसळू दे गाणं गाऊ दे ************* कंटाळा आला मला फार चल सिनेमाला *************** जास्तीचा पैसा काय कामाचा फायदा चोराचा ***************** बोलली नाहीस मला कांही केलं असतं काहीही ****************** वारेमाप पैसा खर्च केला चोरीचा मामला ****************** मी आता शांत आहे बायको  करता ******************* खेळायला मैदान सापडत नाही खेळती मोबाईलवरून ******************** पैसा किती कमवावा हे ज्याने त्याने ठरवावे आपण का सांगावे ******************** उगाच उपदेश देत फिरू नये वेळेचा नाश  ******************* हलक्या कानाचे असू नये आपल्याला काय करायचे ********************** महेश भा. रायखेलकर
Image
  काही हायकू देव कोणाचे वाईट करत नाही गैरसमज काहींचे ============= कामापेक्षा गप्पा मारतात जास्त पगार मस्त =============== हक्क मागता तशी  कर्तव्ये पाळावीत काय सांगता ================ गरजा जास्त वाढवू नयेत जगावे मस्त ================ सगळ्या वस्तू झाल्यात महाग स्वस्ताई ला लागली  आग ================= पैसा कोठे जातो कळत नाही तुम्हाला व मलाही ================== सिनेमातलं काही खरं नसतं जग कोठे समजतं ==================== गाणं म्हणायला मला आवडते असं ती म्हणते =================== आवड निवड वेगवेगळ्या असतात म्हणून तर भांडतात ===================== तूला काहीच कसं कळत नाही सगळं सांगावे मीच ======================= महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू मी काहीही करेन तुला काय त्याच काहीतरी भलतच ------------------ तुम्ही एकदिवशी बघा ज्याने केला तुमचा अपमान त्यालाही घालावी लागेल खाली मान ----------------------------------- मान-अपमानाच्या पलीकडे आपले नाते का उगाच जीव खाते ----------------------------------- जो तो सांगतो आपला मोठेपणा कोण घेईल कमीपणा ---------------------------------- सामाजीक भान जरूर ठेवा नका होवू बेभान ------------------------------ कोणी काहीही माझ्याविषयी बोलेल मी थोड  ऐकेल -------------------------------- नाही म्हणायला हिंमत लागते कोणालाही ना जमते -------------------------------- रागावू नको तर काय करू काहीही सुरु ------------------------------ मी काय कोणीही म्हणेल तू नखरेल ---------------------------- गरिबांचा कोण वाली नाही सगळीकडे घाण -------------------------- महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू काही माणसे गंमतीशीर असतात सतत हसवतात ============= आयुष्य कंटाळवाणे बनवू नका व्हा शहाणे ============== जे येत नाही ते करून पहा काही नाही होत ============= सगळी माणसे सारखी नसतात उगाच का शंका घेतात =============== मी अद्याप जगलोच नाही केले काहीही =============== तो जीवंत आहे दिसतो मेल्यासारखा चिंतातुर  बुरखा ================  एका प्रश्नाचे अनेक उत्तर शोधा भरभर ================ काय केलं म्हणे इतके दिवस घेत होतो श्वास ================ सायकल सोडली मोटार घेतली ढेरी फुगली =============== महागडे औषध रोज खातो व्यायाम टाळतो ============== महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू जीवनात करावा लागतो संघर्ष मिळतो हर्ष ************ सुख दुःख वाटून घेवू नको रुखरुख ************* जो तो आपलं बघतो पुरता नाडतो ************** रीत-भात सांभाळावी  लागते संसाराचे  खाते *************** बायकोची कटकट मुलाची वटवट मी धांदरट  ************** एवढ  का ताणून घेतेस सोड मोकळा श्वास *************** घड्याळ्याकडे काय अशी पहातेस थांब अजून काही तास **************** एकतर आलीस उशीरा चाललीस लवकर सगळच भरभर **************** सोडून द्यावं असं काही राहील नाही माझे प्राणही **************** मरेस्तोपर्यंत वाईट वागत आलास नरकात चाललास ****************** महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू पहिले जिकायचं ठरवा मनात जिंकू प्रत्यक्षात ************** मी कोणाच्या अध्यात ना मध्यात तरी अडचणीत **************** जास्त भोळे बनू नये हाती गोळे ***************** वेळ नाही असं म्हणता बिनधास्त झोपता ****************** बायको सोबत वाद घालू नये हरण्याची साद ***************** नव-याने घरची कामे करावीत बायकोच्या मुठीत ****************** रिकामटेकडा माणुस काहीही करतो उगाच हसतो ***************** शिव्या देणारी माणसे फालतू असतात अभावी संस्कारी ********************* अंगातला जोर दाखवावा जिथे शिरजोर चोर ******************* चेष्टा सतत करू नये गंभीर बाबतीत ********************* महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू माणुस आपल्या चुका विसरतो दुस-याच्या काढतो *************** माझा हक्क आहे तुझ्यावर का होतेस थक्क *************** कपड्यावरून माणूस ओळखू येत नाही घ्या मनाचा वास *************** हे काय झालं विपरीत तू नाही प्रेमात **************** मी म्हटलं करून तर बघू प्रेमाचं पिठलं **************** मी तूला पाहिलं साडीत झालो चकीत **************** फॅशन करावी शोभेल अशी काय ग म्हशी **************** एकच वादा परत दादा देईल खांदा **************** राजकारणात गुन्हेगार झालेत फार देशाची हार ****************  तुझे डोळे आहेत म्हणे भोळे अंगाराचे गोळे **************** महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता कोणीतरी म्हटलंय अन्यायाविरुद्ध लढा                                                                                                          सांगायला काय जातंय                                                                                                          ***************** तुला पाहिजे सर्व बसल्या ठिकाणी आळसाची नोंदणी ****************** एक...
Image
हायकू कविता आत्ताच कस प्रेम ऊतू आलं काय  काम निघालं                                                                                                 **************** काहीही झालं तरी मी जिंकेल मगच थांबेल **************** काम करतांना त्याच त्याच चुका नको  यशाची पायरी चढतांना   **************** उगाच वायफळ बोलू नये परिणाम निष्फळ ****************  एक तर तू कर नाहीतर मी करतो नको फुकाची मरमर **************** मला सापडलं यशाचे इंगीत जा नाही सांगत **************** यशा आधी अपयश येते मन खचते *************** तू तुझ्या नव-यासोबत मी माझ्या बायकोसोबत प्रेमाची गंमत ***************** गात रहा फुलत रहा झुलत रहा ****************** जीवनाचे गीत मी गाईन मग ...
Image
हायकू कविता  अशी माझ्याकडे काय पहातेस मला लाजवतेस   ************* एकमेकांचे प्रश्न दोघे मिळून सोडवू दुसऱ्याला कामाला न लावू ******************** ऐक तू  जरा थोडं माझं नकोस सदाच ऐकवू तुझं ******************** ज्यात त्यात घेतेस संशय प्रेमात पडायच आहे का वय ********************* तूच काय मी पण हैराण प्रेमाची खाण ****************** तुझ्या घरी मी येईल तुला घेवून जाईल **************** हे नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर घेतलीस तू माघार *************** काय आई-वडिलांना विचारून माझ्यावर प्रेम केलंस त्यांना मध्ये का आणलंस ******************** आपल्या प्रेमात  जर आलं कोणी आड घेईन खबरबात ***************** ये काहीही सांगू नकोस कळतंय मलाही **************** महेश भा. रायखेलकर
Image
  भारतीयत्व हाच धर्म !!!  भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व  मागील काही दिवसापासून फार अस्वस्थ झालो आहे  . मनावर  निराशेचे मळभ दाटलेत  . मन अगदी विषष्ण झालंय  . केवढा हा प्रचंड द्वेष, केवढा हा भयंकर  तिरस्कार, केवढे हे आरोप प्रत्यारोप, केवढ्या ह्या मोठ्या जातीच्या भिंती?  का असं होतंय?  यातून काय साध्य करायचंय ?  कोठे चाललोत आपण ?  कोठे कमी पडलोत  आपण?  हे असं घडतंय कारण आपण भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा विसरलो आहोत , धर्म जातींची झापडे लावल्यामुळे आपली भारताप्रतीची नजर, निष्ठा धूसर झालीय. आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर,  राजर्षी  शाहू महाराज , फुले, सावरकर  यांची शिकवण विसरलो आहोत . आपण महात्मा गांधींनी घालून दिलेला अहिंसेचा  मंत्र विसरलो आहोत.  या सर्व महापुरुषांना जाती- जातीत विभागण्याचा करंटेपणा आपण करतो आहोत . या  व इतर सर्व महापुरुषांनी आपले सर्वस्व अर्पण केले या 'देशासाठी', नाही की  व...
Image
काही हायकू दुस-याच्या भावना दुखावतील असं लिहू नये देशविरोधकांना लेखणीने हाणा ************************ लेखणीला धार असते फार   क्रांतीचा ललकार   ************************ तू भेट मला एकांतात होईल तुझा राग शांत ********************** इतके होवूनही मी तुझ्यावर रागावू शकत नाही प्रेमात आपण दोघेही ***********************  मुलं वाढवण्यामध्ये एक वेगळा आनंद आयुष्यातील सुंदर छंद ********************* कोणताही बाप आनंदी होतो जेव्हा मुलं जिकंतो ******************* लाचार बाप हताश आई मुलं कसाई ******************* स्वतःसाठी वेळ आहे आई-बापासाठी नाही शोभता का हे?  ****************** नियतीच्या आहे सर्व हातात माणुस आपल्या तो-यात ******************* संकटे येतात आणि जातात खंबीर टिकतात **************** महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता काळजी वाटते मला तुझी काळीज चिरते =========== एक एक क्षण आठवतो तुझ्याबरोबरीचा मन होते विषण्ण ================= माझे भोग मी भोगेन तुझ्या मागे न लागेन ================= माझंच चुकलं मी प्रेम केलं तुझं काय गेलं =============== खिसा गरम असला की बरं वाटतं नाहीतर सारेच नरम ============== दंगेधोप्यांनी कोणाचेही बरे होत नाही सर्वत्र  लाही लाही ============== धार्मीक एकोपा जरूर जपावा शत्रूला वाव न द्यावा =============== आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते सर्वस्व आपले देते ============== आईची मायेची सर कोणासही येत नाही सांगे  साक्षात परमेश्वर =============== चांगला कान तयार करा भान ठेवून ============== महेश भा. रायखेलकर