पु स्तक परिचय "मृत्युंजय" (कादंबरी) पुस्तक : मृत्युंजय (कादंबरी) लेखक : श्री. शिवाजी सावंत प्रकाशन : कॉंटिनेंटल पृष्ठ संख्या : ६०१ "मृत्युंजय" या कादंबरीने मराठी साहित्यविश्वाला एका उंचीवर नेवून ठेवले आहे. लेखक श्री. शिवाजी सावंत यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने महाभारतातील "कर्ण" या उपेक्षित, शापित नायकाचा जीवनपट अशारितीने रेखाटला आहे कि वाचकाच्या मनात त्याच्याबद्धल सहानभूती व आदर निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. समस्त सृष्टीला प्रकाश व जीवन देण्याया प्रत्यक्ष सूर्याचा "कर्ण" हा पुत्र. पण आपले जन्माचे रहस्य माहीत नसल्याने आयुष्यभर उपेक्षित व अपमानित होवून आपले जीवन व्यतीत करतो व शेवटी आपण कोण आहोत हे कुंती व श्रीकृष्ण यांच्याकडून समजून सुद्धा आपले कर्त्यव्य व मित्र धर्मापासून तो तसूभरही मागे हटत नाही. युद्धात आपण अधर्माच्या बाजूने लढतो आहोत व यात आपला ...