Posts

Showing posts from October, 2017
Image
खरं सुख  मोठा बंगला नसला  तरी चालेल  घराला घरपणं असलं  पाहिजे मुलं उच्चं    नाही शिकली  तरी चालेल  चांगला माणुस बनली पाहिजे दारात  चार चाकी नसली तरी चालेल   रात्री झोप  शांत लागली पाहिजे बायको सुंदर नसली तरी चालेल मनाने सुंदर  असली पाहिजे जावई गर्भश्रीमंत नसला तरी चालेल  निर्व्यसनी  तो असला  पाहिजे सून श्रीमंताची  नसली तरी चालेल  संस्कारी  ती असली पाहिजे गाठी मालमत्ता  नसली  तरी चालेल  अंगी नीतिमत्ता  असली पाहिजे श्रीमंत झालोत  नाहीत तरी चालेल  शरीर उत्तम राहिलं   पाहिजे ओळखी खूप  नसल्या तरी चालेल चार जीवंलग  मित्र  असली  पाहिजे मोठा गोतावळा नसला तरी चालेल काही आपुलकीची नाती जोडली   पाहिजे शेवटी जास्त काही कमवलं नाही तरी चालेल मनाला शांती    लाभली पाहिजे © महेश भा. रायखेलकर
Image
मानवी  इच्छा परीक्षेत चांगले मार्क मिळावेत हि एक इच्छा ! उच्चं शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळावे हि एक इच्छा !  चांगले करीअर घडावे  हि एक इच्छा ! मोठया पगाराची नोकरी मिळावी  हि एक इच्छा ! नोकरी-व्यवसायात उच्चं पदावर जावे हि एक इच्छा ! सुंदर-सुस्वभावी बायको मिळावी  हि एक इच्छा ! सुदृढ मुलं-बाळ व्हावीत हि एक इच्छा ! परदेशवारी व्हावी  हि एक इच्छा ! स्वतःचे घर असावे  हि एक इच्छा ! घरासमोर चार चाकी असावी  हि एक इच्छा ! हाताखाली नोकर-चाकर असावेत हि एक इच्छा ! घरात सर्व प्रकारची सुबत्ता असावी  हि एक इच्छा ! शरीर-प्रकृती उत्तम असावी हि एक इच्छा ! मनःशांती मिळावी  हि एक इच्छा ! कोर्ट-कचेरीची मागे झंझट नसावी हि एक इच्छा ! समाजात नाव लौकिक मिळवावा  हि एक इच्छा ! समाजसेवा हातून घडावी हि एक इच्छा ! प्रेमळ मित्रपरिवार असावा हि एक इच्छा ! आपुलकीची नाती-मंडळी  असावीत हि एक इच्छा ! मुलांनी शिकून मोठे व्हावे हि एक इच्छा ! भरपूर संपत्ती गाठी असावी हि एक इच्छा ! जावई-सून चांगली मिळावीत हि एक इच्छा ! नातवंड-पतवंड अंगा-खा...
Image
कवितेचा छंद आणी  बायकोशी वाद  एके दिवशी बायको म्हणाली नका तुम्ही कवितेच्या छंदात पडू हे ऐकून मला  आलं कि हो रडू !! मी  हि मग  रागातच म्हणालो  ठीकंय ....तर मग ऐक रिकामा वेळ असेल तेव्हा  सिगरेट ओढत बसतो ! नाहीतर फावल्या वेळेत  तंबाखु-गुटका मी खातो !  जेव्हा निवांत असेल तेव्हा  दारू ढोसत बसतो ! नाहीतर  नुसत्याच मग चिकाटया मारत बसतो ! मोकळ्या वेळेत उगीचच  कशाची तरी चिंता करतो    ! नाहीतर जुगाराच्या नादी  लागून पैसे मी हारतो ! वेळ घालवण्यासाठी मित्रासोबत पार्ट्या झोडतो ! बघ टुकार सिनमे पाहण्यात मग वेळ माझा   घालवतो ! मोबाईल वरील गेम खेळून चष्माचा नंबर वाढवतो ! ऐक शेवटी  नाहीतर मग तमाशालाच जावून  बसतो ! हे सर्व ऐकून  बायको गेली कि हो  घाबरून आणि म्हणाली अगदी ती  काकुळतीला येवून ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू त्या पेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा  छंद सुरु ! कवितेचा  छंद सुरु !! © महेश भा. रायखेलकर ...
Image
मशीनमय माणुस माणुस आजकाल मशीनमध्येच फार गुंतलाय !! त्याला कारणही तसेच आहे कारण , मशीन द्वेष करत नाही मशीन कुत्सित हसत नाही ती टोमणेही मारत नाही ती पुढे पुढे ही करत नाही मशीन खाजगी प्रश्नात नाक खुपसत नाही ती फार अपेक्षाही ठेवत नाही तिला मानही  लागत नाही  आणि तिला अपमानही कळत नाही मशीन संपावर जात नाही ती रजा हि मागत नाही ती  पगारवाढही मागत नाही  आणि ती प्रमोशनही मागत  नाही मशीन कोणाच्या प्रेमात पडत नाही ती कोणाशी मैत्रीही करत नाही तीचे कोणाशी शत्रूत्व असत नाही आणि तिचे कोणाशी ममत्वहि असत नाही मशीन चिरीमिरी घेत-देत  नाही मशीन भाऊबंदकी सांभाळत नाही ती कोणाला लुबाडतही नाही आणि ती कोणाला पिळतहि नाही मशीन कोणाला छेडत नाही ती स्त्री- पुरुष असा भेद करत नाही ती जात-पात मानत नाही आणि ती कोण गरीब कोण श्रीमंत हे जाणतही नाही हे सर्व गुण-अवगुण माणसाचे अजूनतरी नाही लागले ते माणसानेच तयार केलेल्या मशीनला म्हणून तर माणूस आज मशीनमध्येच फार गुंतलाय © महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता सगळेच प्रश्न सुटत नसतात काही नशिबावर सोपवायचे असतात ====================== चूक करणार नाही तो माणूस कसला चंद्रही डागाळलेला ==================== मी म्हणेल तेच खरे असे नाही बरे मस्तवालपणा पुरे ================== तू वाट पाहशील म्हणून फोन केला बराच वेळ व्यस्त लागला =============== तुही ठाम मीहि निग्रही प्रेम करी काम ============= तुझा मला हेवा वाटतो उगीच का फसतो ============= मी तुझ्यावर मरतो तरीही जीवंत आजवर ============= पुन्हा पुन्हा तुझी आठवण येते मन व्याकुळ होते ============ दुस-याच्या खाजगी प्रश्नात नाक खुपसू नये केर आपल्या अंगणात ===============  योग्य ठिकाणी कामी यावे उगीच ना स्वतःला शिणवावे ================= ©  महेश भा. रायखेलकर
Image
बापू बापू ! तुमचा 'अहिंसेचा' मंत्र आम्हाला रुचला नाही पण हिंसेनंही  कुठले प्रश्न सुटतील असे आता वाटत नाही !   बापू  ! तुमचे 'खेडया कडे  चला' हे म्हणणे आम्हाला पटले नाही पण आता रोजच पहातोय शहराचे मरण अगतिक पणे ! बापू !  तुमची 'स्वदेशीची' चळवळ आम्हाला भावली नाही पण आता विदेशी वस्तू वापरता वापरता आत्मादेखील गेलाय विदेशी होवून ! बापू !  तुमचा 'स्वच्छतेचा' वसा कधी आम्ही घेतलाच नाही पण आता घाणीच्या साम्राज्यांत जीव जातोय गुदमरून बापू ! तुमची 'साधी राहणी' आम्ही कधी अंगीकारलीच नाही पण आता पटतंय फक्त उच्चं राहणीमानाने व्यक्तीमत्व खुलत नाही ! बापू! तुमचा 'स्वावलंबनाचा' मंत्र कधी आम्हाला आवडला नाही पण आता समजून येतंय परावलंबनातल गुलामपणं !  बापू! हा देश 'बापूचा देश' म्हणून जगात ओळखला जातोय पण आम्ही करंटे मात्र  फक्त तुम्हाला नोटांमध्येच पहातोय! © महेश भा. रायखेलकर
Image
राहून गेलं  कोणाला भेटावस वाटतं भेटून या परत वाटायला नको राहून गेलं! कोणावर प्रेम व्यक्त करायचं करून घ्या परत वाटायला नको राहून गेलं! कोणा गावाला जायचंय जावून या परत वाटायला नको राहून गेलं! एकाधी वस्तू खरेदी करायचीय  करून घ्या  परत वाटायला नको राहून गेलं! एकाधी कला शिकायचीय  शिकून घ्या  परत वाटायला नको राहून गेलं! एकाधा पदार्थ खावासा वाटतोय  खाऊन घ्या  परत वाटायला नको राहून गेलं! एकाधी स्टाईल करावीशी वाटते  करून घ्या  परत वाटायला नको राहून गेलं! एकाध्याला गिफ्ट द्यावीशी वाटते देवून टाका परत वाटायला नको राहून गेलं! एकाधा छंद जोपासावा वाटतो  जोपासा  परत वाटायला नको राहून गेलं! एकाधा खेळ खेळावा वाटतो खेळुन घ्या परत वाटायला नको राहून गेलं! हे राहून गेलं ते राहून गेलं असं म्हणता म्हणता कधी असं वाटायला नको अरे जगणंच राहून गेलं ! जगणंच राहून गेलं !! © महेश भा. रायखेलकर
Image
मरण झालंय स्वस्त  कोणी पुरात वाहून जातो कोणी गर्दीत चेंगरून मरतो कोणी आगीच्या भक्षस्थानी पडतो तर कोणी सेल्फीच्या नादाने जातो कारण बाकी सगळं चाललंय मस्त फक्त मरण झालंय स्वस्त ! कोणी रस्ते अपघातात ठार होतो कोणी ब्लुव्हेल सारख्या गेम मध्ये संपतो कोणी कुपोषणाने मिटतो तर कोणी प्राण वायूच्या कमतरतेमुळे  जातो कारण बाकी सगळं चाललंय मस्त फक्त मरण झालंय स्वस्त ! कोणी निराश झाल्याने आत्महत्या करतो कोणी कर्जबाजारीमुळे स्वतः ला संपवतो कोणाचा व्यसनामुळे अंत होतो तर कोणी अन्नातून विषबाधेमुळे जातो कारण बाकी सगळं चाललंय मस्त फक्त मरण झालंय स्वस्त ! किड्यामुंग्या एवढी झालीयं माणसाच्या जीवाची किंमत ना  कसला खेद ना कसली खंत काहींचे अपघात , व्यवस्थेमूळे मरण कांही रचती स्वतःच्या हाताने स्वतःचे सरण © महेश भा. रायखेलकर