व्यर्थ न जावो बलिदान याच साठी केला होता का स्वातंञ्याचा अट्टाहास घ्यावा आपणच आज एकमेकांचा घास ! याच साठी गेले का देशभक्त फासावर चालवावी आपण एकमेकांवर तलवार ! याच साठी बांधले का स्वराज्याचे तोरण आजही व्हावे कोण्या द्रौपदीचे वस्त्रहरण ! याच साठी केला होता का सत्याग्रह देशापेक्षा धर्म मोठा चा करावा दुराग्रह ! याच साठी चालवली का स्वातंञ्याची चळवळ देशद्रोहयांची चालुन घ्यावी आज वळवळ ! याच साठी मिळवीले गेले का स्वातंत्र्य वागण्या बोलण्यात नसावे कोणतेच ताळतंत्र ! याच साठी झेलल्या गेल्या का गोळया छातीवर भ्रष्टाचाराने पोखरावे देशाचे घर ! याच साठी भोगली का काळयापाण्याची शिक्षा विखारी शब्दांनी करावी एकमेकांची दुर्दशा ! ऐका भारतमातेचे एकच आहे मागणं व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान ! व्यर्थ न जावो तिच्या पुञ्यांचे बलिदान ! ! © महेश भा. रायखेलकर