कोरोना एक आपत्ती
आली कोरोनाची आपत्ती
जगाची झाली कुंठीत मती
माणसाने खाल्ल्या निसर्गाच्या जाती
अती तेथे होते माती
कशाला घाबरून जायचे
ताजे अन्नच खायचे
हात सदा धुवायचे
गर्दीत जायचे टाळायचे
झेलली अशी आपण अनेक संकटे
कधी पूर कधी दुष्काळाचे काटे
कोरोनाचे संकट ना छोटे
जनमानसात भीती दाटे
नका अफवा पसरू
एक मेका सावरू
माणुसकीचे बीज पेरू
कोरोनावर मात करू
कोरोनावर मात करू
महेश भा रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment