मन ओळखावं 



तुला जसं कौतुक हवंसं असतं
तसं इतरांना  ते काही नकोसं नसतं
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

तुला जसा मान दिला कि तू सुखावतो
तसेच  इतरांना देखील मान हवासा असतो
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

जसं तुला कॊणी दुःखात आधार द्यावासा वाटतो
तसंच  इतरांना असा  दिलेला आधार  नकोसा नसतो
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

जसं तुला शुभेच्छा हव्या हव्याशा वाटतात
तसंच  इतरांना देखील दिलेल्या शुभेच्छा  आवडतात
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

तुला जसा अपमान सहन होत नाही
तसंच अपमानाने  इतरही  दुःखी होतात
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

तुला जसा अतिश्रमाचा त्रास होतो
तसाच  इतरही अतिश्रमाने दमून जातात
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

जसं तुला कॊणी तुझ्या खाजगी आयुष्यात डोकावलं कि चालत नाही
तसंच  इतरांना देखील त्यांचे  काही खाजगी आयुष्य असते
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !

जसं तुझा वेळ लोकांनी पाळावा वाटतो
तसाच  इतरांचा वेळ देखील  त्यांना  महत्वाचा असतो
म्हणून फक्त एकच  करावं
जरा दुस-याच मन ओळखावं !
 मन ओळखावं !!

@ महेश भा. रायखेलकर


Comments

Popular posts from this blog