चिऊताई चिऊताई....
चिऊताई ए चिऊताई
तुझ्या चिवचिव ची सनई
प्रत्येक आई लहान बाळास
गाई तुझ्या नावाने अंगाई
ओळख तुझी लहानपणीची
आता नुसतीच आठवायची
घरटी तुझी झाडावरची
आता तुरळक दिसायची
सिमेंट च्या जंगलाने
संपले तुझे मंजुळ गाणे
केली खूप प्रगती माणसाने
विसरले निसर्गातच आहे सोने
ये परत फिरून तू चिऊताई
नको करुस जाण्याची तू घाई
आतुर झाले कान ऐकण्या
तुझ्या चिवचिवाटीची सनई
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment