हायकू कविता एकच आयुष्य स्वप्ने फार झालो बेजार ====**====== न सतत रागवावे थोड़े शांत रहावे काही सोडूनिया द्यावे ====**======= लहान मुले निरागस असतात जातीभेद न करतात ====**======= तू मला पाहिले मी तुला पाहिले मन एकमेकात गुंतले ====**======= मोर नाचतो आनंदाच्या भरात पाऊस कोसळे जोरात ====**======= तुला न कळले मला न कळले प्रेम हरले ====**======= तुलाही भेटेल कोणीतरी मलाही भेटेल कोणीतरी प्रेम मात्र अधांतरी ====**======= प्रेमापेक्षा मोठा असतो व्यवहार प्रेमाची तेथेच हार ====**======= कोणावरतरी प्रेम करावे जगून पाहावे मग मरावे ====**======= कोन्हीही कोणासाठी थांबत नाही स्वार्थ प्रेत्येकाच्या ओठी ====**======= © महेश भा. रायखेलकर