Posts

Showing posts from April, 2018
Image
असेही कधीतरी व्हावे  असेही कधीतरी व्हावे तू अलगद माझ्या मिठीत शिरावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे पावसात चिंब  दोघांनी भिजावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे हातात हात गुंफूनि फिरावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावं डोळ्यांनी एकमेकांना प्यावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावं मी तूला हळूच चुंबावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे आपण  एकमेकांना ओळखावे असंही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे मनीचे हितगुज करावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे सुख दुःख वाटुनि  घ्यावे  असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे दोन  जीव  मन एक व्हावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे जन्मोजन्मीचे नाते जुळावे असेही कधीतरी व्हावे असेही कधीतरी व्हावे ©  महेश भा. रायखेलकर
Image
जिच्या हाती पाळण्याची दोरी  कौसल्या व्हावं लागेल तुला जर घडवायचा असेल  एकवचनी राम ! यशोदा व्हावं लागेल तुला जर घडवायचा असेल   गीता सांगणारा श्रीकृष्ण ! कुंती  व्हावं लागेल तुला जर घडवायचे  असतील  धनुर्धारी अर्जुन,महापराक्रमी भीम आणि धर्मराज युधिष्टिर ! राधा व्हावं लागेल तुला जर घडवायचा असेल दानशूर  कर्ण ! जिजाऊ व्हावं लागेल तुला जर घडवायचा असेल जाणता राजा शिवाजी ! भीमाबाई व्हावं लागेल तुला जर घडवायचा असतील क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर ! भुवनेश्वरी देवी व्हावं लागेल तुला जर घडवायचा असतील  स्वामी विवेकानंद ! आशिमा   व्हावं लागेल तुला  जर घडवायचे  असतील विज्ञाननिष्ठ डॉ. अब्दुल कलाम धन्य धन्य  त्या माता ज्यांनी घडविले अनेक महापुरुषांना ऊठ ,जागी हो, डोळे उघडून पहा  तुझ्याच हाती आहे उद्याच्या जगाचे भवितव्य ... ! ©  महेश भा. रायखेलकर 
Image
सुट्टी  मला लागली उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासाची आता माझी कट्टी सकाळी आता उशीरा मी उठणार शाळेला जायची गडबड मागे  नसणार दिवसभर  मित्रांसोबत मी  खेळेन अधूनमधून कार्टून पहात मी  बसेन   आई मला छानसे आईस्क्रीम करून देईन                                                                                                 ऊसाचा मस्त थंडगार रस मी पिईन आई-बाबांसोबत ट्रीपला मी जाईन हॉटेलात आवडीची डिश मी  खाईन आवडीचा  पिक्चर टॉकीज मध्ये  मी बघेल बाबांसोबत टँकवर जाऊन पोहायला मी शिकेल जमल्यास छंद वर्गाला मी जाईल नवीन एखादी गोष्ट शिकून मी घेईल आंब्याच्या रसावर ताव मी मारील छान छान गोष्टी आबा मला सांगतील १ मे ला माझा...
Image
हायकू कविता रात्र रात्र जागलो तुझ्यासाठी नकाराची ती काळरात्र *************** तू माझ्या स्वप्नात  येते सकाळ होते ************* तुझ्या सुखात माझं सुख भावनेला हात ************ दिवसामागून दिवस गेले प्रेम मेले ********** तू धूंद मी बेधूंद लाज मंद ********* मला वाटते तुलाच पहात रहावे जग विसरावे ************ जनरीत पाळली पाहिजे हि कुठली रीत ************ चेष्टा करा कुचेष्टा नको नातं मारा ********** नात्यात विश्व्वास पाहिजे नको अंधविश्व्वास ************* तूला पहातो माझ्या घरात मी स्वप्नात *********** ©  महेश भा. रायखेलकर
Image
                                                                    अच्छे दिन आम्ही सार्वजनिक वस्तू घरी चोरून नेणार आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?  आम्ही तंबाकू,गुटका खाऊन जागोजागी थुकंणार आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ? आम्ही कचरा कोठेही टाकणार  आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?  आम्ही कोणत्याही कामासाठी चिरीमिरी घेणार-  देणार  आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ? आम्ही वाहतुकीचे नियम तोडून वाहने चालवणार  आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?  आम्ही सार्वजनिक ठिकाणावर काहीही अभद्र लिहून ठेवणार    आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ? आम्ही ऐपत असतांना  अनुदान नाही सोडणार आणि म्हणणार 'अच्छे दिन' केव्हा येणार ?    आम्ही गरिबीचं सॉंग घेवून योजनेचा लाभ घेणार  ...
Image
काही हायकू लोकं सल्ले देत असतात आपण ऐकायचे नसतात ++++++++++++++++ मी म्ह्टलं नव्हतं असच होणार तुझे माझे जमणार   +++++++++++ किती जपतेस तू मला आहे मी तुझ्यासाठी खास +++++++++++++++ ताबडतोब हे काम कसे होणार वेळ खाणार ++++++++++++++ जे पाहिजे तूला ते मी दिलं माझे काही ना राहिलं ++++++++++++++ हेच तू सांगणार होतीस जीव झाला कासावीस +++++++++++++++ हे बघ मी काही नाही केलं जे झालं +++++++++++++ काहीच कसे तुला कळत नाही सर्व सांगावे लागते मला +++++++++++++++ कर जबाबदारीतुन मला मुक्त मी सुस्त ++++++++++++++ सर्व काही येथील नाशवंत कशाची खंत ++++++++++++ महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू आपण चांगलं तर जग चांगलं आता समजलं ------------------ कशाला उगाच खोटं बोलायचं खरं वागायचं ------------------ भेट मला एकदा निवांत जिथे एकांत ------------------ भेट तुझी कधी   होणार तुझा  नकार ----------------- कसं सांगू तुला काय वाटतंय कुठं उमगतंय ------------------ कोण म्हणतं मी हरलो जरा थांबलो ----------------- उमगले ते कोडे जे मला पडले होते ----------------- उगाच येथे थांबू नकोस जा तेथे ---------------- राहील मी तुझ्या शिवाय नाही पर्याय ---------------  गेला शीण तुला पाहून उतरला  ताण -------------  महेश भा रायखेलकर
Image
हायकू कविता गरज आहे म्हणून मला विचारतो तुला ************ जो तो आहे आपल्याच नादात माणसाची जात ************* काहीही करून ते कर नको हार ************** स्वतःचेच तू खरं करतेस कुठे ऐकतेस ************* कोण तू मला सांगणार नाही ऐकणार ************* मी नाही तर कोण करणार तू माझी होणार ************* तूच सांग कसं वागू तुला लागू ************ तूच कर माझा विचार भावनेचा भार ************* असतेस ऐकलं जर माझं झालं असत भलं ************* जगात मीच तुला सापडलो वेडा झालो ************
Image
काही हायकू शिक्षकांनी समाज घडवावा बाकीच्यांनी बिघडवावा ****************** प्रेम श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाही फुकटचा रतीब ******************* आजचे काम   उद्यावर नको   गाळा घाम                                                                                                          *************** आळशी माणूस सबब सांगतो काहीच ना करतो ************** गेलेली वेळ परत येत नाही नको टाळाटाळ ************* उगीच शांत बसल्या पेक्षा चालवा हात *********** झाले गेले विसरून जाऊया पुढे पाहूया *********** संकटे कधी कधी एकदम येतात परीक्षा घेतात ************ चांगला माणूस कोठेही मिसळतो एकाकी ना राहतो ************* यशस्वी होणे हा एक प्रवास ना थकणे *...