Posts

Showing posts from March, 2018
Image
असं कधी होत  का  ?  अमावस्याच्या भीतीने  पौर्णिमेचा चंद्र पाहण्याचं  कोणी सोडतं का  ?   निर्माल्यचं होणार  म्हणून फुल फुलायचं   कधी थांबतं  का  ? प्रेमभंग होईल म्हणून  प्रेमात पडायचं  कोणी टाळतं का  ? पानगळीच्या भीतीने  झाड बहरण्याचं  कधी थांबवत  का  ? हरण्याच्या भीतीने  खेळ खेळायचं  कोणी  सोडतं का  ? अस्त होणार  म्हणून सूर्य उगवायचा  कधी थांबतो का  ? स्वप्नभंग होईल म्हणून  स्वप्न पाहण्याचं   कोणी थांबवत  का  ? रात्र होणार   म्हणून  दिवस उजडायचा  कधी रहातो का   ? अपयशाच्या भीतीने  कोणी प्रयत्न करण्याचं    कधी सोडतं   का  ? कापणीच्या भीतीने  कोणतं पीक उगवायचं  कधी राहतं का  ? शेवटी मरणाच्या भीतीने  जीवन जगण्याचं  कोणी  सोडतं का  ? ©  महेश भा. रायखेलकर 
Image
माझ्या हायकू कविता  माझा आहे आज उपवास जेवायचा बेत खास +++++++++++++ तू अस्वस्थ मीही अस्वस्थ कोण करेल स्वस्थ                                                                                                     +++++++++++++ पथ्य-पाणी पाळत नाहीस तू आजारपणी +++++++++++ स्वतःची तब्येत तू सांभाळ नको ढिसाळ +++++++++++ प्रसिध्दीसाठी तो काहीही करतो पैसे मोजतो +++++++++++ कधीतरी दुस-याचेही थोडे ऐकावे आपले दामटून न न्यावे +++++++++++++++ एकदा विश्वास जर गमावला मग संपला ++++++++++++++ मी आहे आज आजारी  डॉक्टरच्या घरी +++++++++++++++ कितीदा सांगितलं तरी ऐकत नाही बोलणं सोडून दिलं +++++++++++++++ तूला काही चालत नाही मला काहीही +++++++++++++++ महेश भ...
Image
आवर्जुन चांगले पहा, चांगले ऐका, चांगले वाचा हा लेख लिहीत असतांना  मला गांधीजींच्या त्या तीन माकडांची आठवण झाली जे कि सांगतात वाईट पाहू नका , वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका. गांधीजींच्या विचारांचा योग्य तो सन्मान ठेवून मला आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जेथे कि द्रूक-श्राव्य माहीतीचा सर्वत्र  भडीमार होत  आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल, दूरदर्शन  वरून चोवीस तास माहितीचा महापूर वहात आहे  जो की  आपण इच्छा असूनही टाळू शकत नाही मला  असे नमूद करावेसे वाटते आवर्जुन 'चांगले पहा', 'चांगले ऐका', 'चांगले वाचा'. याची सुरवात आपण स्वतःपासून करून त्याचे बीज आपल्या पाल्यात रुजवणे आजच्या काळात अत्यंत  आवश्यक झाले आहे. चांगले पहा - आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही  ना काही पहात असतो. आपण काय पहातोय याचा परिणाम आपल्या विचारांवर होत असतो व आपले व्यक्तिमत्व त्यानुसार घडत असते. पण आजच्या काळात वाईट पहाणे आपण टाळू शकतो का?  तर काही प्रमाणात नाही. पेपर मधून येणा-या अर्धनग्न जाहिराती, दूरदर्शन...
Image
काही हायकू प्राणी माणसांपेक्षा प्रामाणिक असतात दगा न देतात                                                                   ************* आई बापाची सेवा करणे हेच एक पुण्य बाकी गोष्टी  नगण्य ***************** तिन्ही सांजेला अशी रडू नकोस चल डोळे पूस *************** तुझे हात माझ्या हातात गुंफले जगणे सुरु झाले **************** पहा अशी माझ्या डोळ्यात तुझ्यासोबतचा एकांत ***************** तू गेलीस विसरुनी सा-या माझ्या सोबतच्या गोड  आठवणी *************** तेच तेच किती वेळा सांगतेस तू माझ्या प्रेमात आहेस **************  पुण्य कमवावे लागते तर पाप हातून होते *************  तुझे पत्र वाचतो आहे प्रेमाचे तंत्र *********** तीच तू जिने दगा दिला मला संपविला *********** ©  महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता स्वीकारले मी वास्तव तू माझी होणार नाहीस अपेक्षा अवास्तव ---------------------- तूही तीच मीहि तोच बदलला तो काळच                                                                          ------------------  जो तो म्हणतो मीच खरा खोट्याचा नखरा ----------------  पैसे देवून आयुष्य घेता येत नाही टाका खर्च करून ------------------ केल्याने अहंकार माणसे दुरावतात द्या त्यास नकार ---------------- पुढारी पांढरे कपडॆ घालतात काळे कर्म करतात ----------------- आल्याशिवाय आमंत्रण परक्याकडे जावूं नये अपमानास निमंत्रण -------------------- तू बदललीस मी नाही प्रेमाला फसवलीस ------------------ प्रत्येकात एक लहान मुल दडलंय हेच विसरलंय ---------------- प्रेमाला वय नसते लग्नाचे  असते © महेश भा. रायखेलकर 
Image
क्षणभंगुर आयुष्य  कधी,कसा, कोठे मृत्यू येईल हे सांगता येत नाही जगुन घेवु  प्रत्येक  क्षण जो पुन्हा येणे नाही कशाला धावायचं ऊर फुटेपर्यंत  उद्याच्या साठी माहित नाही किती शिल्लक  आयुष्य आपल्या गाठी येईल मरण एकेदिवशी  अन ठोठवेल  दार कसा देवू शकुत त्यासोबत जाण्यास नकार कशाला करीत बसायची व्यर्थ  कशाची तरी चिंता करून घेऊ जे करायचे ते आज ,या क्षणी , आत्ता जाणीव ठेवु  आयुष्य आहे क्षणभंगुर माहित नाही  उरले किती  अजुन अंतर करु  आनंदाने प्रत्येक क्षण पार नसेल खेद जरी आला मृत्यू   समोर ©   महेश भा. रायखेलकर
Image
माझ्या हायकू कविता आपली माणसं जेव्हा आपलेपणा ठेवत नाहीत तेव्हा होतो त्रास                                                                                 ****************** आयुष्य कसे जगावे हे उशिरा कळते चाळीशी उलटलेली असते ****************** चांगले पेरा चांगलेच उगवेल वाईटावर उतारा *************** नको अशी नादी तू लावू सभ्यपणावर चढे बुरशी *************** दिल्या घरी तू सुखी रहा तुझे तू पहा *************** या वयात शोभतं का? मन कधी म्हातारं होतं का? ***************** म्हातारं पण सगळ्यांनाच येतं तरुणपण सरतं परत बालपण येतं ****************** तुझ्या नजरेचा बाण गेला आरपार उघड प्रेमाचं तू दार ****************** तुझं हसणं चांदणं बरसणं मला हरवून जाणं **************** जन्माला आलेला कधीतरी मरणारचं श्रुष्टीचा नियम कडक फारचं ...