हायकू कविता

तारुण्य तुझे
सळसळणारे
काळीज कापणारे
==========
तू अशी
जवळी रहा
मला पहा
=========
दिवस तुझे हे फुलायचे
आणि माझे
तुला पाहून झुरायचे
=============
तुझी बरोबरी
कोणी करू शकत नाही
दुनिया  सरासरी
=============
कधीही खोटे
बोलू नये
ख-याचे फार तोटे
=============
यौवनात तू
मोहात मी
गाफील तू
===========
सर्वांमध्ये
मिळून मिसळून रहावे
एकाकी न व्हावे
=============
तू सोडलेस
असे मला एकाकी
काय राहिलं बाकी
===========
नको अशी
रुसून तू बसू
चल हसू
==========
तुझ्यात माझ्यात
पडले अंतर
आठवणी मनात
============

© महेश भा. रायखेलकर





Comments

Popular posts from this blog