"खरेदी" बायकोसोबतची


बायको सोबत गेलो बाजारात खरेदीला
जीव माझा आला पुरता मेटाकुटीला
तिला पाहिजे प्रत्येक  वस्तू स्वस्त आणि मस्त
 बाजारपेठ घातली त्यासाठी पालथी  समस्त !

साडीचा हिच्यासमोर मांडला दुकादाराने ढीग
तरी ना आळवे ही पसंदीचा राग
हळूच मला म्हणे नका तुम्ही घाई करू
अजून चार दुकान आपण दोघे फिरू !

भावासाठी करी ती दुकानदारासी घासाघीस
कंटाळून माझा जीव होई कासावीस
ती म्हणे यातलं  तुम्हाला  नाही कळत
मी मग  निवांत बसे एका खुर्चीत  !

मुलगा मध्येच म्हणे बाबा मला भूक लागली
घरचं अन्न लागतं त्यास जशी कडू कारली
बायको म्हणे पहिले चला चांगल्या हॉटेलात
चार घास घालू पोराच्या पोटात !

पसंदीची खरेदी झाली कि ती खुश होऊन जाई
मीही  म्हणे सार्थकी लागली आपली कमाई
पिशव्या सांभाळात घराकडे निघे आमची सवारी
मागे बसुनी खरेदीचा तोंडी ती हिशोब करी !

घरात खरेदी आणून टाकली कि होई आमची सुटका
तोपर्यंत खिसाही झाला असतो हलका हलका
आनंदाने बायको म्हणे तुम्ही निवांत खरेदी पहा
तोपर्यंत टाकते  मी आपल्या सगळ्यांना चहा !


© महेश भा. रायखेलकर






Comments

Popular posts from this blog