केस गळती
केसानेच माझा गळा कापला
जेव्हा डोक्याचा चंद्र अर्धा दिसू लागला !
कितीतरी तुझे लाड मी केले
कधी सुगंधी तेल कधी शाम्पूने धुतले
तरी तू असाकसा दगा मला दिला
एक एक करुनी गळत चालला !
वेगवेगळे कट मारुनी तुला मी सजविले
त्यासाठी नाव्ह्याचे खिसे मी भरले
तरी तू का होतोस असा पाठमोरा
बरं नाही बा असा तुझा तोरा !
एकेकाळी मुली होती पुरत्या घायाळ
पाहुनी माझ्या डोक्याच्या केसाची आयाळ
गेले ते क्षण राहिल्या नुसत्या आठवणी
केली तू माझी अवस्था पार केविलवाणी !
बरं आहे का असं तुझं वागणं
खाल्या अन्नाला न रे जागणं
थोडे दिवस अजूनी माझी सोबत कर
जावु नकोस असा रे तू भरभर !
माहितीय येणार नाहीस तू फिरुनी परत
तुझ्यासाठी नाही बसणार मी रे रडत
नसेल तुझ्या नखऱ्याची मागे कटकट
छानशी करून घेईन मी गांधीकट !
छानशी करून घेईन मी गांधीकट !!
.jpg)
Comments
Post a Comment