थोडं थांबूया, नंतर कृती करूया खटकणारं बोललंच पाहिजे का? थोडं चूप रहावं दुसरे लागण्यासारखं बोलले तर कसं वाटेल ? ते आपल्या मनाला पुसावं अपमान केलाच पाहिजे का ? थोडं गप्प रहावं इतरांनी मान दिला नाही तर कसं वाटेल ? हे आपल्या मनाला पुसावं रागावणं केलंच पाहिजे का? थोडं शांत बसावं दुसऱ्यांनी संताप केला तर कसं कसं वाटेल ? हे आपल्या मनाला पुसावं टिंगल- टवाळी केलीच पाहिजे का ? थोडं चूप रहावं दुसऱ्यांनी टपली मारली तर कसं वाटेल ते आपल्या मनाला पुसावं निंदा-नालस्ती केलीच पाहिजे का ? थोडं शांत रहावं दुसऱ्यांनी द्वेष - तिरस्कार केला तर कसं कसं वाटेल? ते आपल्या मनाला पुसावं खोटं-नाट वागलं पाहिजे का ? थोडं चांगलं वागावं इतरांनी लांडी- लबाडी केली तर कसं कसं वाटेल ? हे आपल्या मनाला पुसावं फसवणूक केलीच पाहिजे का ? थोडं प्रामाणिक राहावं दुसऱ्यांनी टोपी घातली तर कसं कसं वाटेल ? ते आपल्या मनाला पुसावं ताठ वागलंच पाहिजे का का ? थोडं नम्र रहावं दुसऱ्यांनी ...