महाराष्ट्र माझा 

 भवानी माता जेथे वसती तो महाराष्ट्र माझा
विठ्ठल उभा जिथे  विटे वरती तो महाराष्ट्र माझा!

शिवाजी ची जन्मभूमी तो महाराष्ट्र माझा
संताची जी कर्मभूमी तो महाराष्ट्र माझा!

फुले-आंबेडकरांना  जेथे पूजती तो महाराष्ट्र माझा
गौरी-गणपती  ची जेथे भक्ती तो महाराष्ट्र माझा !

वेरुळ-अजिंठा लेण्यांची जेथे महती तो महाराष्ट्र माझा
शाहीर जेथे पोवाडे गाती तो महाराष्ट्र माझा !

गान कोकिळा जेथे  राहती तो महाराष्ट्र माझा
क्रिकेटच्या देवाची जेथे वस्ती तो महाराष्ट्र माझा !

तालमीत जेथे   चाले कुस्ती तो महाराष्ट्र माझा
फडावर लावण्यांची  जेथे  मस्ती तो महाराष्ट्र माझा !

मराठी आहे जिथे माऊली तो महाराष्ट्र माझा
सह्याद्री ची जिथे पडे सावली तो महाराष्ट्र माझा !

तारे-तारकांची जिथे मायानगरी तो महाराष्ट्र माझा
साहित्यात ज्ञानपीठाची भरारी तो महाराष्ट्र माझा

शिक्षणाची   जिथे असे गंगोत्री तो महाराष्ट्र माझा
उद्योगधंद्याची जेथे  जंत्री तो महाराष्ट्र माझा !

देशाच्या राजकारणात ज्याने उमटविला ठसा तो महाराष्ट्र माझा
समाजसेवेचा ज्याने घेतलाय वसा तो महाराष्ट्र माझा !

आर्थिक राजधानी देशाची  जिथे तो महाराष्ट्र माझा
देश- रक्षणा  सैनिक जिथे घडती  तो महाराष्ट्र माझा !
देश- रक्षणा  सैनिक जिथे घडती  तो महाराष्ट्र माझा !!

© महेश. भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog