सुर्यकोप


कारे बाबा  येवढा का कोपलास
आजकाल तु एवढा का तापलास
अंगाची होई नुसती  लाही लाही
कितीही पाणी पिल तहान भागत नाही !

तुझ्या आगमनाने चालु होई दिवस
पण आज तुझ्यामुळे जीव  कासावीस
प्रत्यय आला तुझ्या प्रखरपणाचा
माणूस घामाने वितळे बर्फासारखा !

तु पुरवी ना कोणाचेही लाड
रस्ते बाजार पडे आज सताड
करुनी अपार व्रुक्षतोड
मारुनी घेतली पायावर आम्ही  कु-हाड !

आरे बाबा आता जरा हो तु  शांत
नको पाहुस असा आमचा तु अंत
तुझ्या मुळेच चालु हि सृष्टी
राहु दे आमच्यावर तुझी कृपादृष्टी !
राहु दे आमच्यावर तुझी कृपादृष्टी!!

© महेश भा.  रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog