व्यथा
जन्माआधीच माझ्या मरणाची किहो तयारी
देवा तुझ्या दुनियेची तर्हाच न्यारी !
जिजाऊ लक्ष्मिबाई चे गातात नुसते पोवाडे
माझ्या जन्मानंतर यांचे तोंड का हो वाकडे !
मला शिकवले जातात अब्रु वाचवण्याचे धडे
यांच्या पोरांचे पाऊल सदाच वाकडे !
मोकळेपणी बाहेर फिरायला मज वाटे लाज
यांना आलाय यांच्या पुरुषत्वाचा माज !
समजतात मला सदाच परक्या घरची
लग्नाआधी करते चाकरी यांच्या घरची !
घालतात सतत माझ्या शीलावर घाला
शरीरातील यांच्या आत्मा काहो मेला !
हुंड्या साठी जाळतात मला उठसुठ
माणुसकीचे बसवलं काहो यांनी मढ !
कश्याला देवा यावे असल्या धरणीवर
त्यापेक्षा देवा तुझे घरच सुंदर !
त्यापेक्षा देवा तुझे घरच सुंदर !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment