Posts

Showing posts from July, 2018
Image
  गुरु एक 'श्रद्धास्थान ' गुरुविणा कोण दाखवील वाट गुरुविणा कशी होईल पहाट ! गुरु असे दिशादर्शक जीवनाचा एक मार्गदर्शक! गुरु करी चांगले संस्कार दगडास देई मूर्तीचा आकार ! गुरुविणा कोण देईल आधार शिष्याचा वाहील कोण भार ! गुरुविणा कोण घेईल परीक्षा चुकल्यास कोण देईल शिक्षा ! शिष्याच्या यशात गुरुचे यश  उभा खंबीर जरी आले अपयश ! गुरुविणा कसा ज्ञानसागर पार शिष्यास दाखवेल कोण पैलतीर ! गुरुचा वर्णावा किती महिमा परब्रम्हांची त्यास उपमा ! गुरु असे माझे श्रद्धास्थान सदाच मी त्यांच्यासमोर लीन ! गुरुचा वाढतो सन्मान पाहून शिष्याची यशाची कमान ! पाहून शिष्याची यशाची कमान!!
Image
काही हायकू  जो दुस-यांच्या आनंदात आनंदी होतो तोच माणुस असतो ***************** लाजून तू जेव्हा पहातेस मनात बसतेस **************** जे चांगले ते घ्यावे बाकी सोडूनि दयावे **************** सतत किरकिर करू नका आयुष्य सुंदर *************** बायकोची मदत जरूर घ्या सुखात आणि दुःखात **************** लहान मुल देवाघरच फुल खुप अनमोल *************** नकारत्मक लोकांपासून दूर रहा यश पहा ****************** व्हायचे ते होवून जाऊदे होत्याचे नव्हते ****************** मी तर सांगीतले मला वाटते ते तू ऐकले का ते ******************* महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता तुझ्या प्रेमात वेडा मी झालो शहाणपण विसरलो ============= तूला पहाताच प्रेमात मी पडलो वहातच गेलो =========== प्रेमात माणूस अंधळा होतो खड्ड्यात जातो ========== आपल्यातील प्रश्नाला प्रेम हेच उत्तर नको करुस निरुत्तर ============ कोणी कोणाचे जेव्हा ऐकत नाही उत्तर नसे प्रश्नाचे =========== तुझा रुसवा मी काढेल सांगेल ते ऐकेल =========== तू अशी जवळ येतेस दूरचे पहातेस ========= प्रेमाची किंमत करता येत नाही पैसे लागतात खिशात ============== नको अशी होवूस अधीर थोडा धर धीर ============ श्रीमंतांचे प्रेम होते सफल गरिबांचे असफल ============ ©  महेश भा. रायखेलकर
Image
व्हॅलेंटाईन डे स्पेशल हायकू  तूला पाहून वाढे हृद्यायची धडधड नको ती धडपड ============= जाते म्हणतेस जा मी कोठे आडवतोय पण तुझा पाय कोठे निघतोय =================== कशाला पाहतेस तुझे सौदंर्य आरशात पहा माझ्या चेह-यात =============== हातात हात गुंफूनि चालू जीवनाची वाट बिनभोभाट ============== तुझी अन माझी जोडी जमली इतर मेली  ============== माझे सुख घे तूला तुझे दुःख दे मला प्रेमाचा मामला ============ तुझ्या प्रेमात मी हवेत तू नशेत =========== तुझी सोबत मी निर्धास्त विश्वास जास्त ========== पाहून तुझ्या गालावरचा तीळ मारतो मी शीळ ============ पाहून तुझा साज श्रुंगार झालो मी गार ========== ©  महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता दिसणं सुंदर छान मनात घाण ========= कोणी कोणाला कमी लेखू नये प्रत्येक जीव अनमोल                                                                                                        ============= तू तुझ्याच तो-यात मी अडकित्यात ============ जा अशी फसवू नको डाव मोडू नको ========== तुझ्या बरोबर रंगला संसार जीवनी  आनंद फार ============ उगाच ताठ वागू नये फुटणार कधीतरी माठ ============== तुला कळल्या का माझ्या भावना सांग ना ============ जे मनात तेच ओठात भरडलो जात्यात ============ तरुण पण एकदाच येतं नंतर म्हातारं होतं =========== तूझे तारुण्य मखमली गालावर लाली =========== ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू माणूस मोठमोठ्या गोष्टीत आनंद शोधतो आयुष्यभर दुःखी रहातो                                                                                ++++++++++++++++++ वेळ आल्याशिवाय काही साध्य होत नाही संयमास नसे तरणोपाय                                                                                                               ++++++++++++++++++ काही होत नाही नुसते विचार चांगले वाचून जीवनात उतरवा आचरणातून ++++++++++++++++++++ तेच तेच करून काही वेगळे कस...