हायकू
लग्न करून
नक्की पहा
मिळतो ऐता चहा
================
संसारात संकटे
येतात
बायकोच्या हातात
================
बायकोचे मत
जरूर घ्यावे
खापर फोडावे
================
बायकांची खरेदी
संपत नाही
हुडका झोपायला गादी
================
बायको मुलात
मी रमतो
संकटे झेलतो
================
बायकोचे थोडे
कौतुक करा
सुटेल सुखाचा वारा
==============
जावई माणसाचे
कौतुक फार
सगळ्यांचीच हार
============
मित्राच्या लग्नात
खूप नाचलो
मग जेवलो
============
व-हाडी येतात
लग्नात जेवण्यासाठी
आहेराची वसुली जोरात
================
कन्यादान हे
पवित्र दान
लागते नसीब छान
===============
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment