हायकू कविता
तुझ्या बरोबरचा
डाव मी हरलो
संपून गेलो
*********
काय तिच्या मनात
मला तेव्हाच कळेल
जेव्हा ती सांगेल
*************
चांगुलपणा म्हणजे
कमकुवत पणा नव्हे
वाईटपणा माजे
*************
माणूस रस्त्यावर
जेव्हा उतरतो
माणूस ना रहातो
*************
काबाडकष्ट करून
पैसे मिळविले
पोराने फुकले
***********
पोरं चांगली निघावीत
म्हणून संस्कार त्यांच्यावर केले
कुसंस्काराचे दिवस चांगले
*********************
कसं सांगू तुला
मनातलं गुपित
मी शापित
*****************
नको शिकवूस
शहाणपणा मला
पुढारी म्हणत्यात मला
*****************
पांढरे कपडे घातले
म्हणून माणूस स्वच्छ होत नाही
चारित्र्य डागाळलेले
********************
राजकारणातून
समाजकारण
अवघड व्याकरण
*****************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment