हायकू कविता
नको अशी
मला तू पाहू
बघतोय तुझा भाऊ
*************
सात जन्म
तुझी सोबत करणार
हा जन्म कधी संपणार?
***************
मन माझे
गेलीस तू घेवून
शरीराचे झाले ओझे
***************
तुझेच आहे
माझे सर्वकाही
फक्त मी नाही
**************
नको नको म्हणत
प्रेमात पडलीस
चांगलीच अडकलीस
**************
प्रेमात तुझ्या
मी पडलो
अख्खा बुडालो
************
प्रेम तुझे
माझ्यावर जडले
खर्चाचे फावले
************
'नाही' कसे
म्हणू तूला
'हो' तूला
*********
तू अवखळ
मी पोरकट
प्रेमाची फरपट
**********
शुन्यातून मी
स्वर्ग उभारला
नरक पाहिला
****************
महेश भा. रायखेलकर
नको अशी
मला तू पाहू
बघतोय तुझा भाऊ
*************
सात जन्म
तुझी सोबत करणार
हा जन्म कधी संपणार?
***************
मन माझे
गेलीस तू घेवून
शरीराचे झाले ओझे
***************
तुझेच आहे
माझे सर्वकाही
फक्त मी नाही
**************
नको नको म्हणत
प्रेमात पडलीस
चांगलीच अडकलीस
**************
प्रेमात तुझ्या
मी पडलो
अख्खा बुडालो
************
प्रेम तुझे
माझ्यावर जडले
खर्चाचे फावले
************
'नाही' कसे
म्हणू तूला
'हो' तूला
*********
तू अवखळ
मी पोरकट
प्रेमाची फरपट
**********
शुन्यातून मी
स्वर्ग उभारला
नरक पाहिला
****************
महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment