Posts

Showing posts from May, 2018
Image
काही हायकू आत्ताच कोठे डोळा लागला फोन वाजला ************* जर तुझं ऐकलं असतं बर झालं असत संकट टळलं असत *************** जर तर च्या गोष्टी सांगू नकोस होतो त्रास ************** मीच काय तुही करू शकणार नाही असे काही **************** ये चल प्रेमात एवढं चालायचंच बावळट मीच **************** रागाने माणुस वेडा होतो म्हणूंन टाळतो **************** आत्ताच असं बोलू नकोस होईल ह्स ************** मी सांगतो तसंच होणार तू पावणार ************** का खोटं बोललीस तू मला कळेल का मला ************* माणूस जात करते घात माणसाचा हात ************* महेश भा. रायखेलकर
Image
माझ्या हायकू  रोज एकदा तरी खळाळून हसा नाही लागत पैसा *********** जो दुस-यावर   सतत हसतो   त्याला देव फसवतो                                                                  **************** सासरी जास्त दिवस राहू नये जावई मस्त **************** नको करुस असा साजशृंगार जग वाईट फार ******************* डागही आहे म्हणे चंद्रावर माणसाची सावरासावर ****************** मीच सदा बोलतो तू नुसतं ऐकते असं कुठं असते ***************** जो दुस-यावर सतत जळतो तो मरतो ***************** त्याचा भर चांगले दिसण्यावर माझा चांगले असण्यावर ******************* तू खळाळून जेव्हा हसतेस वाटतं फसवतेस ****************** तुझा झाला खेळ माझा गेला वेळ ***************** महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू प्रेम सफल  होण्यास लागते भाग्य मोडायला दुर्भाग्य ***************** एक एक करत सारे निघूनी गेले बंध तुटले =========== मागे वळून पहावे काय चुकले ते जाणावें मग पुढे जावे ============= स्वतः बरोबर इतरांचाही विचार करावा सदाच स्वार्थ न साधावा =============== नशीबवान ते ज्यांचे प्रेम सफल झाले बाकींच्याचे स्वप्न विरघळले ********************** सगळीच गोड बोलणारी माणसे चांगली नसतात शब्द फिरवतात ********************* नात्यात व्यवहार आल्यास सुरु नाते विरघळण्यास ********************* नको तुलना एकमेकांच्या मुलांची सुंदर  बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची *************************** मुलांचे करता अती लाड पडेल एकेदिवशी धाड *********************** मुलांवर ठेवा दुरून लक्ष करेल व्यसन भक्ष **********************  लखलखणारी प्रेत्येक वस्तू सोनं नसते जग  वरवर पहाते ******************** वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळा मृत्यूचे दार टाळा ******************* © महेश भा. रायखेलकर 
Image
काही हायकू माणुस सुखात देवाला विसरतो दुःखात आळवितो ************* देव आहे तुझ्या आणि माझ्यात कारे शोधिशी मंदिरात                                                                                 **************** मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो वाटत मेलो ***************** संसारात माणुस एवढा गुंततो परमेश्वराला विसरतो **************** तू हसलीस अन फसलीस माझ्यात मिसळलीस ***************** मी माझा कोठे राहिलो तुझाच झालो भरून पावलो **************** नाते जास्त ताणू नये जाते मोडकळीत **************** संसारातील गरजा संपत नाहीत जन्मठेपेची सजा *************** आजकाल शिक्षण झालंय खूप महाग पालकांची दाणादाण *************** जीवनाकडून माणुस खुपकाही शिकतो कधी ना विसरतो ************** महेश भा. रायखेलकर
Image
        आई आई म्हणजे असते आपल्यातील ईश्वर मूल  पहिल्यांदा बोले  `आई ' हेच अक्षर ! आई म्हणजे असते मायेचे अंथरुण विसावासाठीचे ते एक उबदार पांघरुण  ! आई म्हणजे असते  दुधावरची साय कोणी  म्हणे तिला माउली, तर कोणी माय! आईच्या हातचे कोणतेही अन्न जिभेला लागे जसे ते पक्वान्न  ! आई जेव्हा फीरवे पाठीवरुन हात शीण सारा जाई विसरून एका क्षणात! आईच्या आशीर्वादात एवढी  ताकद कोणत्याही संकटावर मूल सहज करी मात! आईचे  मुलावर  प्रेम   निरागस जसे हरणिचे  निष्पाप पाडस ! आईला वाटे  आपलं मूल सदाच छोटं जरी ते झाले कितीही मोठं  ! आई जरी असली आपल्यापासून दूर तिची  नजर सतत आपल्या पिंल्लावर! आईच्या पोटी जन्म घेई साक्षात विधाता तिला पूजण्यास तोहि माने धन्यता ! महेश भा.  रायखेलकर 
Image
माझा छंद  माझा आनंद       आजच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात छंद म्हणजे रणरणत्या वाळ वंटातील हिरवळच होय. छंद निराश  मनाला उभारी देण्याचे काम करतो व तसेच जगण्याची एक नवीन  उमेद वाढविण्याचे काम करीत असतो.प्रत्येक व्यक्तीने एखादातरी छंद जोपासावा.कितीही व्यस्त जीवन असेल तरीही छंदासाठी जाणीवपूर्वक वेळ  काढावा असे माझे प्रामाणिक मत आहे.  वाचन करणे, जुनी गाणी ऐकणे व म्हणणे , सांस्कॄतीक कार्यक्रमाला आर्वजुन हजेरी लावणे, चांगले सिनेमे पाहणे, कविता करणे, लिखाण करणे  असे काही माझे आवडीचे छंद आहेत.  हे सर्व छंद माझ्या जीवनात आनंद देण्याचे काम करतात व यात माझे मन रमून जाते.  या छंदापैकी सर्वांत आवडता व माझ्या अगदी जवळचा छंद म्हणजे कविता करणे हा होय.  हा छंद मागील ब-याच   वर्षापासून मी आवडीने जोपासला आहे.           कित्येक वर्षापासून काही तरी लिहावे असे सतत मला वाटायचे.  पण काय?  हे मात्र सुचत नव्हते. एकदा एक ‘जसे पे...
Image
काही हायकू मी भोळा तू भोळी प्रेमाची गोळी ++++++++++ कोणीतरी येवून  चांगले करेल असं कसं घडेल ++++++++++++ जो तो उठतो घोटाळे करतो देशाला लुटतो +++++++++++ काय हे तुझे सोंग करतेस ढोग ++++++++++++ मी नाहीतर कोण करणार तुझा स्वीकार +++++++++++ नको चंद्र नको तारे बदलले वारे +++++++++++ कोण म्हणते असे झाले नाही चागले ++++++++++ आपल्या माणसाचा कसला त्रास प्रेमाचा भास +++++++++++++ आज पासून असं होणार नाही सांगतो ठासून ++++++++++++ ही आहे माझी जबाबदारी नको काहीतरी ++++++++++++ ©  महेश भा. रायखेलकर