काही हायकू
राजकारण म्हणजे
करून घोटाळे
व्हावे नामनिराळे
************
भूक लागली
पोटाला
नको पाजळु अक्कल
***************
गरजू माणसाला
अक्कल नसते
तडजोड शिकवते
*************
अनुभवा सारखी
शाळा शिकवते फार
जात नाही बेकार
**************
बाहेरून चांगली
दिसणारी एखादी वस्तू
आतून नासलेली
****************
राजकारणात
पक्षांतर म्हणजे
तत्वांचा घात
*************
जो तो उठतो
राजकारण करतो
पुढारी समजतो
************
नेत्याचे भाषण
म्हणजे
विसराळूपण
***********
तूपण तरुण
मीपण तरुण
बसलो प्रेम करून
*************
नेहमीच डोळ्याला
दिसेल ते
सत्य नसते
*************
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment