शेजारच्या घरात जन्मावा शिवाजी

शेजारच्या घरात जन्मावा शिवाजी
आपल्या बाळाने मस्त खावी पुरी- भाजी ।।१।।

दुस-याने पाठवावे देशरक्षणा सैेनिका
आपल्या राजूने शिकून गाठावी थेट अमेरिका ।।२।।

कोणीतरी परक्याने करावी समाजसेवा
आपल्या पिल्याने खावा आनंदाने मेवा ।।३।।

इतर कोणीतरी राष्ट्रासाठी  झटावे
आपल्या पोराने फक्त आपल्या 'कुुळाला' उद्धारावे  ।।४।।

दुसरा कोणीतरी करेल अन्याविरूध्द बंड
आपल्या छोटुने रहावे नुसतेच बर्फासारखे थंड ।।५।।

सतत दुसरा कोणीतरी करेल  हेच पहावे
आपण मात्र आपल्या शिंपल्यात अलगद जगावे !
आपण मात्र आपल्या शिंपल्यात अलगद जगावे !!

(महेश भा.  रायखेलकर)

Comments

Popular posts from this blog