एक देव अनेक रूपं 


परवा मुलाने विचारले बाबा अल्ला   म्हणजे काय ?
मी म्हटलं....  देव !
पण नंतर विचार केला.....  खरंच तसं आहे ?
आपण तर देवाचीही विभागणी केलीय ! जसं कि ----
राम, श्रीकृष्ण, गणेश आदि देव हिंदूंचे
मोहंमद पैगंबर ,आल्हा मुसलमानांचा
येशू  ख्रिश्चनांचा
गुरुनानक  शिखांचे
महावीर जैनांचे
गौतम बुद्ध बुद्धांचे
आणि .... असे  अनेक
खरं पाहिलं तर
हि एकाच देवाची अनेक रूपं
हे जेव्हा माणसाला कळेल
तेव्हा धरतीवरच स्वर्ग अवतरेल !

© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog