डे

प्रेम व्यक्त करण्यासाठी ' व्हॅलेटाईन- डे" लागतो
नल-दमयंती च्या तरल प्रेमाला चक्क आम्ही विसरतो

मैत्रीची महती साठी 'फ्रेइण्डशिप- डे' लागतो
कृष्ण-सुदामाच्या निर्व्याज मैत्रीला  चक्क आम्ही विसरतो

आई वरच्या प्रेमासाठी ' मदर्स-डे' लागतो
साने गुरुजींच्या श्यामच्या- आई ला चक्क आम्ही विसरतो

बापासाठी  आम्ही 'फादर्स- डे' साजरा करतो
म्हातारपणी त्याला आधार द्यायला मात्र चक्क आम्ही विसरतो

फुलांची देवाणघेवाण साठी आम्हाला रोझ-डे लागतो
अंगणातील पारिजातकाचा सुगंध घ्यायला चक्क आम्ही विसरतो

जिभेचे चोचले पुरवायला 'चॉकलेट-डे ' लागतो
नात्यातील गोडवा राखण्यास चक्क आम्ही विसरतो

अश्याप्रकारे सगळ्या 'डे' चे 'सेलिब्रेशन' आम्ही करतो
आपल्या परंपरागत उत्सवांना मात्र चक्क आम्ही विसरतो


© महेश भा . रायखेलकर



  

Comments

Popular posts from this blog