शेतकरी
रक्ताच्या घामाचे बी जमिनीत पेरतो
पावसाची वाट टक पाहत बसतो
अवकाळी ने मात्र पुरता मोडूनी जातो
उभी पीकं आडवी झालेली डोळ्याने पाहतो !
म्हणतात मला मी आहे अन्नदाता
आहे का हो मला कोणी त्राता
मलाही वाटे चांगले दिवस यावे
चार घास बायका पोरांना घालावे !
सावकार काढतो मला पिळुनी
कर्जातच जातो मी मरुनी
कसे आहात तुम्ही सर्व धोरणी
पोटभर खाउनी झोपता घोरुणी !
मी अन्नदाता तर का मी उपाशी ?
माझाच घास पळवण्यास का सर्व अधाशी ?
मी श्रमदाता जर मी कष्टकरी
माझ्याच नाशिबी का सदाच मीठभाकरी ?
अंगावर बायकोच्या माझ्या फाटक लुगडं
नेहमीच पोर माझ अर्ध नागडं
मी पांघरे ओबढधोबड घोंगड
साला आमचं नशिबच लंगड !
सरकार आमचे मायबाप
कवडीमोलाचे योजनेचे पदरात माप
डोस्कं चालवुनी करा असा अचार
ज्यामुळे होणार नाही मी लाचार !
नका नका पाहू माझा असा अंत
ज्वालामुखीला नका करू वर वर शांत
झाला जर सर्वाचा कडेलोट
मोडुनी पडेल तुमच्या सत्तेचा सारीपाट !
मोडुनी पडेल तुमच्या सत्तेचा सारीपाट !!
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment