युती
कमळ म्हणे धनुष्याला आपण दोघे भाऊ भाऊ
चल दोघे मिळुनी सत्तेचा मेवा खाऊ !
निवडणुका आधी मोडली आपण युती
बघितली सत्ता येते का एकहाती !
प्रचारात केली एजमेकावंर येथेच्छ चिखलफेक
जनतेसाठी होती ती एक धूळफेक !
काढली एक दुस-यांची उकरूनिया पाप
जनतेच्या डॉकयाला दिला पुरता आपण ताप !
पारदर्शकता, मराठी अस्मिता असे वापरले मोठं -मोठे शब्द
तरी माहित नाही जनतेने का द्यावा असा प्रतिसाद !
आता म्हणूया युती शिवाय नाही कोणताच पर्याय
पहिलेच सुचायला पाहिजे होता आपणास हा रामबाण उपाय !
ऐक आता ताणू नकोस तू तुटेपर्यंत तुझा बाण
राखावी आपणच आपली पत आणि शान !
थोडे कमी थोडे जास्त चाखु सत्तेचे आपण लोणी
हात , घड्याळ, हत्ती , ईजिंन नको पतंग कोणी !
सत्ता आल्यानंतर परत करू एकमेकांचा दुस्वास
यातून वेळ मिळाल्यास साधू राज्याचा विकास !
सांभाळ, नको सोडूस तू आमच्या राज्यावर बाण
नाही सहन होत आम्हास असा केलेला अपमान !
पाच वर्षानंतर परत वठवू असेच पुन्हा नाटक
त्याशिवाय कशी होणार जनतेची करमणूक !
चल दोघे आता ऐकू मतदारराजा चा कौल
नाहीतर तोच करेल नंतर आपणास सत्तेतून बेदखल !
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment