वजन 

वजन,  वजन,  रे वजन
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

वाढतांना मणा-मणाने तु रे वाढतोस
कमी होतांना मात्र कणा-कणाने तू कमी होतोस
 वजन,  वजन,  रे वजन
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

तू कमी व्हावास म्हणून डायट मी करतोय 
तेलकट-तुपकट,गॉड, जास्त खाण्याचं मी टाळतोय 
वजन,  वजन,  रे वजन
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

घामाघूम होईपर्यंत व्यायाम मी करतो
कधी सुर्यनमस्कार कधी भर-भर चालतो
 वजन,  वजन,  रे वजन
कमी हो, कमी हो,  तू कमी हो
'तब्येत उतरलीय' म्हटलं कोणी की   फार छान वाटतं 
'जाड्या' कोणी म्हटलं की  मनाला फार रे लागतं 
म्हणून तुला रे  सांगतोय  वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

दर १५ दिवसाला तूला मी तोलतो
तू कमी झालास की खुश  मी होतो
वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

अधून-मधून आरशात पोट माझे बघतो
बायकोला कमी झालंय का? असे   सारखे विचारतो
वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

सुटलेले पोट मलाही नाही रे आवडतं
पण  काय करू डायट,व्यायामाचा त्रास नाही रे सोसवत
वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू रे बाबा  कमी हो

आठवड्यातून एक दिवस उपास माझा असतो
बघूया या कामी तरी देव मला का पावतो
वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

पोरग लहान असतांना ढेरीवर माझ्या  खेळायचं
तेच कार्ट आता 'ढेर-पोट्या' म्हणूनमला चिडवतं
म्हणून तुला सांगतो वजन,  वजन,  रे वजन 
कमी हो, कमी हो,  तू कमी हो

प्रतिष्ठेचे 'वजन' वाढणं कधीही रे चांगलं
तुझं 'वजन' वाढून शरीराचे नाही होणार भलं
 म्हणून तर तूला   सांगतो वजन,  वजन,  रे वजन
कमी हो, कमी हो,  तू  बाबा कमी हो


© महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog