पहिले काढूया सेल्फी 

मंदिरात गेलोत
देवदर्शन राहिलं बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

हॉटेलात गेलोत
जेवण राहिलं बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

कुठल्या कायर्क्रमाला गेलोत
मनोरंजन राहिलं बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

लग्नाला गेलोत
अक्षता टाकायच्या दिल्या सोडून
पहिले काढूया सेल्फी !

सहलीला गेलोत
सहलीचा आनंद राहिला बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

कोणत्या स्पर्धेत भाग घेतला
स्पर्धा राहिली बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

थोर व्यक्तीच्या भेटीत
 त्यांचे विचार ऐकायचे सोडून
पहिले काढूया सेल्फी !

निसर्गाच्या सानिध्यात
त्याचे सौन्दर्य अनुभवायचे सोडून
पहिले काढूया सेल्फी !

प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली
 त्याचे वैभव पाहायचे सोडून
पहिले काढूया सेल्फी !

मित्रमंडळी- नातेवाईकांना खूप दिवसांनी भेटलोत
सुख- दुःखाची देवाणघेवाण करायची सोडून
पहिले काढूया सेल्फी !

समाजसेवा करण्यामध्ये देखील
सेवा राहिली बाजूला
पहिले काढूया सेल्फी !

या सेल्फीच्या नादाने
पडलो इतके स्वतःच्याच प्रेमात
वाटे आपल्या सारखे कोणीच
नाही या जगात !
वाटे आपल्या सारखे कोणीच
नाही या जगात !!

महेश भा. रायखेलकर
(०२.०३.२०१७)








Comments

Popular posts from this blog