Posts

Showing posts from February, 2017
Image
हायकू कविता गेले ते दिवस राहिल्या आठवणी डोळ्यात येई पाणी माझी नजर दूर जाते ती जवळ येते मनाच्या कुपीत आहे ती अजून माझे गोड गुपितं स्त्री  असुरक्षित कायदा व्यवस्था टांगलीय वेशीत मला  नसे कोणताही धर्म माणुसकी हेच माझे मर्म दिवस जाता जाईना रात्र सरता सरेना काळ पुढे सरकेना तो अजून लहान मोठा जेव्हा होईल 'व्यवहार' त्याला कळेल पैशाशिवाय मोठे जगात काही नाही तत्व मूल्य हरवले कोठे किड्यामुंग्यांसारखे माणसाचे जीवन रोज रोज मरतो परत परत जगतो फुलपाखरासारखे मी हि उडावे अलगद जगावे ©  महेश भा. रायखेलकर
Image
   फिरस्ते  उघडयावरच चाले यांचा संसार वर आकाशाचे छत, खाली धरणीचा आधार ! ऊन, पाऊस,वा-याशी सतत यांचा  झगडा त्यावर मात करुनी हाकावा आयुष्याचा गाडा! काटयाकुटक्या जाळुनी मांडीयली चूल बायका भाजती भाकर सांभाळीत मुल ! निरागस पोरं खेळती आजुबाजुला मातीचा सुगंध अन् दगडधोंडे सोबतीला ! गडी जुंपले यांचे दिवसभर कामाला कवडीमोल दाम त्यांच्या कष्टाच्या  घामाला ! नाही उदयाची चिंता आणि कसला हव्यास पोटाची खळगी भरणे हाच एक ध्यास ! आज इथे  उदया तिथे असे चाले वारंवार जसे विंचवाचे बि-हाड त्याच्या पाठीवर ! कष्टमय जीवन तरी हे बिनधास्त सदाच तयार करावयास परिस्थितीशी दोन हात! असे कितीतरी जीव आजही  उघडयावर इमल्यांची ना पडे त्यावर नजर ! इमल्यांची ना पडे त्यावर नजर !! महेश भा. रायखेलकर
Image
 हायकू कविता  १. शिळं फाटकं    दुस-याला न द्यावे    जे खावू  घालू शकतो ते दान करावे २. तूच आहेच तुझ्या     जन्माचा शिल्पकार     ज्योतिषांचा धंदा चालतो फार ३. पालक बालक     दोघेही मोबाईलवर     संवादाला घरघर ४. एक चंद्र नभात      एक तुझ्या चेह-यात      मी तुझ्या मोहात ५. नको अशी     लाजून तू पाहू     लाज झाली नकोशी ६. मी आहे निवांत     डबक्याला का असते     वाहण्याची भ्रांत ७. नको जावू मला सोडून     नाही जगणार तुझ्या वाचुन      यमालाही ठेवेन  मी थोपवून ८. तुझं बोलणं     जसं पैंजणांचं वाजणं     माझं अबोल होणं ९. देवाने  दिलय  तुला भरभरून      नको जाऊस अशी तू मातुन      प्रेमाचे गीत गाऊ दोघे मिळून १०. हे कसले आलेत संत      वासनेचे वळवळे       यांच्या मनात जंत ©...
Image
हायकू कविता माझ्या घरी तू येशील का मीठ भाकरी खाशील का ***************** तू श्रीमंत मी गरीब प्रेम विपरीत ***************** परीक्षेत कॉपी करून झालो पास जीवनात नापास *************** मीही प्रेमात तुही प्रेमात प्रेमाची जाहिरात                                      ************** तुझ्यासाठी प्राण माझे देईन जीव तुझा घेईन ************ तुमच्यासाठी मी झिजलो गाठली यंदा साठी ************* प्रेमाची परीक्षा पास झालो संसारात अडकलो ************* प्रियकर आणि नवरा वेगवेगळा असतो लग्नानंतर कळतो ************** लग्न करून पहावे सुखाला मुकावे ************* लग्नाअधी होतो मी एकटा आता हाती वरवंटा ************* © महेश भा. रायखेलकर  
Image
हायकू कविता माणूस कधी जनावर होतो माणसाला खातो ************ नको तुलना इतरांच्या आयुष्याची खात्री काय त्यांच्या भविष्याची ******************* दया करा मुक्या प्राण्यांवर नका उठू त्यांच्या जीवावर *********************** गरीब असला तरी त्यालाही आहे जीव ठेवावी जाणीव **************** अपेक्षा ठेवून मदत करू नका कर्माची नोंद देवाच्या वहीत ******************* चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते उशीरा कळते ****************** यशासाठी फार तपश्यर्या करावी लागते घाईघाई नडते ***************** यश म्हणजे एक प्रवास नाही होत विनासायास ***************** जे यशस्वी लोक नम्र असतात तेच  भावतात *************** मोठेपणा मागून मिळत नाही लहानपणा येतो धावून ***************** © महेश भा.  रायखेलकर 
Image
  'ती' सध्या घाबरते  अन्यायाविरुद्ध दाद मागायला 'ती' सध्या घाबरते ! नोकरीच्या ठिकाणी  जाण्यास 'ती' सध्या घाबरते! एकटीने प्रवास करण्यास 'ती' सध्या घाबरते! सातच्या नंतर बाहेर पडण्यास 'ती' सध्या घाबरते! शहरात  एकटीने राहण्यास 'ती' सध्या घाबरते! मनाजोगता पेहराव करण्यास 'ती' सध्या घाबरते! कॉलेज ची वाट चालण्यास  'ती' सध्या घाबरते! क्लासेस , ट्यूशन च्या  रस्त्यावरून जाण्यास  'ती' सध्या घाबरते! मुक्तपणे जीवन  जगण्यास  'ती' सध्या घाबरते! गर्दीच्या ठिकाणी जाण्यास  'ती' सध्या घाबरते! नात्यावर विश्वास ठेवण्यास  'ती' सध्या घाबरते! स्वतःच्या  भावना व्यक्त करण्यास ' ती' सध्या घाबरते! पुरुष जातिशी  मैत्री करण्यास  'ती' सध्या घाबरते! सिनेमे , सहली , हॉटेल  मद्धे  जाण्यास  'ती' सध्या घाबरते! उत्सवा मद्धे सहभाग घेण्यास ' ती' सध्या घाबरते! शिक्षणासाठी  बाहेर राहण्यास  'ती' सध्या घाबरते!  ती सध्या घाबरते, ती सध्या घाबरते ...