कर्मयोगी
अरे परेमेश्वरा का वाटला आमचा हेवा
म्हणुन आज नेले तु आमचीया देवा !
एक नावाडी जो देश वलव्ही
ज्यांची प्रेरणा स्फुलिंग फुलवी !
एक कर्मयोगी एक ज्ञान योगी
एक विज्ञान निष्ठ एक देश जोगी !
शीर झुकावे असा एक महापुरुष
ज्यांनी अवघे खर्चिले देशासाठी आयुष्य !
ना मांडला यांनी स्वत:चा संसार
जगभर केला ज्ञानाचा प्रचार !
स्वप्न पाहण्यास यांनी शिकविले
देशासाठी काही करण्यास यांनी सांगीतले !
एक दिपस्तंभ आज तोही निमला
देश सारा शोक सागरात बुडाला !
अब्दुल कलाम तुम्हां त्रिवार सलाम
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !!
© महेश भा. रायखेलकर
ना मांडला यांनी स्वत:चा संसार
जगभर केला ज्ञानाचा प्रचार !
स्वप्न पाहण्यास यांनी शिकविले
देशासाठी काही करण्यास यांनी सांगीतले !
एक दिपस्तंभ आज तोही निमला
देश सारा शोक सागरात बुडाला !
अब्दुल कलाम तुम्हां त्रिवार सलाम
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment