छोटु  विचारे…. 

छोटु म्हणतो  या जगात चोरच नसावे
मी सांगे  असे झाले तर पोलीसांनी  काय खावे

छोटु विचारे आई-बाबा तुम्ही कामाला का जाता
मी सांगे खाऊ खायला तुला येता-जाता

छोटु सांगे बाबा खेळणी साठी ए.टी.एम. मधुन पैसे काढा
मी म्हणे  त्यात भरण्यासाठी वाचावा लागतो कामाचा पाढा

छोटु पुसे बाबा दारू म्हणजे काय
मी सांगे दिवाळीत जी उडवली जाय

छोटु विचारे  बाबा  मी तुमच्या एवढा कधी होणार
मी सांगे बाळा तु माझ्यासाठी सदाच लहाण असणार

छोटु विचारे बाबा देव कुठे असतो
मी म्हणे तुच सांग  तो कुठे नसतो

छोटु विचारे बाबा खोटं का बोलु नये
मी सांगे काय बोललंय हे लक्षात ठेवाव  लागु नये

छोटु पुसे बाबा रेनबो ला हात लावलं तर काय होईल
मी सांगे तुझे हात सप्तरंगाने रंगुन जाईल

छोटु विचारे बाबा रात्री झाडाचे पान का तोडु नये
मी सांगे तुझ्यासारखे तेही झोपुन जाये

असंख्य बालसुलभ प्रश्नांचे छोटु उठवे काहूर
काहींचे उत्तर असते तर  काही निरुत्तर


   © महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog