शाळा बाह्य
मलाही वाटे रोज शाळेत जावे
पाटी-पुस्तक वह्या मध्ये मीही रमावे !
काढावे छान सुंदर अक्षर
असावे सोबत डबा आणि दप्तर !
वाचावा खडा-खडा एखादा धडा
करावा तोंडपाठ गणिताचा पाढा !
घालावा स्वच्छ टापटीप गणवेश
चमकावा बुट करून पॉलीस !
म्हणावे राष्ट्रगीत होवुन सावधान
तिरंग्याचा बाळगावा अभिमान
करेन मीही रोजचा गृह्पाठ
असेल मलाही कविता तोडंपाठ !
शिकुन-सवरून खुप मोठे व्हावे
आई-बापाला सुखात मी ठेवावे !
व्हावे ह्यांचे स्वप्न हे पुर्ण
शिक्षणा वाचुन सर्वच अपुर्ण !
करा सरस्वतीला लक्ष्मीच्या जोखडातून मुक्त
पिऊ दया प्रत्येकास ज्ञानअमृत मनसोक्त !
न्या यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश
उजळवतील हे देशाचे भविष्य !
उजळवतील हे देशाचे भविष्य !!
© महेश भा. रायखेलकर
पाटी-पुस्तक वह्या मध्ये मीही रमावे !
काढावे छान सुंदर अक्षर
असावे सोबत डबा आणि दप्तर !
वाचावा खडा-खडा एखादा धडा
करावा तोंडपाठ गणिताचा पाढा !
घालावा स्वच्छ टापटीप गणवेश
चमकावा बुट करून पॉलीस !
म्हणावे राष्ट्रगीत होवुन सावधान
तिरंग्याचा बाळगावा अभिमान
करेन मीही रोजचा गृह्पाठ
असेल मलाही कविता तोडंपाठ !
शिकुन-सवरून खुप मोठे व्हावे
आई-बापाला सुखात मी ठेवावे !
व्हावे ह्यांचे स्वप्न हे पुर्ण
शिक्षणा वाचुन सर्वच अपुर्ण !
करा सरस्वतीला लक्ष्मीच्या जोखडातून मुक्त
पिऊ दया प्रत्येकास ज्ञानअमृत मनसोक्त !
न्या यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश
उजळवतील हे देशाचे भविष्य !
उजळवतील हे देशाचे भविष्य !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment