निसर्ग-कोप

अगर गेल्यास तु माझ्या विरुद्ध
हरपुन टाकील मी तुझी शुद्ध
होवुन येईल मी भुकंप
प्रगतीला सुटेल तुझ्या कंप !

अगर केल्यास तु माझ्यावर मात
करील तुझा अध्याय मी समाप्त
येईल मी सुनामीच्या रूपाने
उध्वस्त इमारती पत्ताच्या बंगल्याप्रमाणे !

अगर  केल्यास तु मला उध्वस्त
नाही बसु देणार मी तुला स्वस्थ
दाखवीन पावसाचे रूप अक्राळ-विक्राळ
संपेल तुझ्या जीवनाचा कार्यकाळ !

अगर  केलीस तु माझी हानी
नाही म्हणु शकणार तु आनंदाने गाणी
देईल तुला उन्हाचा असा तडाखा
उठेल तुझ्या अंगाचा पुरता भडका !

अगर पोहचवल्यास तु मला क्षती
होवुन जाईल तुझी कुंठीत मती
बरसेन कधी अवकाळी गारपीट
करेल तुझी-पिकाची ताटातूट !

अगर केल्यास तु माझे नुकसान
गळुन पडेल तुझे अवघे अवसान
थंडीने टाकेल मी असे गारठुन
रक्त जाईल तुझे पुर्ण गोठुन !

दिले मी तुला भर-भरून
जावु नकोस तु असा मातुन
केलास तु माझा सांभाळ
 सगळीकडे असेल सुकाळ !
सगळीकडे असेल सुकाळ !!


© महेश भा.  रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog