जीवन-वास्तव्य
कशाला वागतोस एवढा तु ताठ
शेवटी जमिनीला टेकणार तुझी की रे पाठ !
कशाला वापरतोस बोलण्यात अपशब्द
शेवटी होणार तु की रे निशब्द्ध !
कशाला करतोस तु अवैध धंदे
पुरणार तुला शेवटी चारच खांदे !
कशाला हवी तुला खोटी मान-प्रतीष्ठा
कावळा करी तुझ्या शेवटी पिंडाला उष्टा !
कशाला जमवतोस भ्रष्ट्राचारातून तु संपत्त्ती
जाळणार तुला जरी तु करोडो-अब्जोपति !
कशाला बळकावतोस लोकांच्या तु भूमी
स्मशान रे तुझी शेवटची कर्मभूमी !
कशाला पळवतोस दुस-यांचा तोंडातला तु घास
मृत्यू आवळेल शेवटी तुझ्या गळयाभोवती फास !
कशाला धावतोस तु ऊर फुटेपर्यंत
तुझा शोक फक्त चौदा दिवसापर्यत !
करावी थोडी प्रभूची प्रार्थना
नसावी कोणतीही असुरी कामना !
प्रेम असावे सर्वांबद्धल मना
भला आहे अशी असावी जगाची धारणा !
भला आहे अशी असावी जगाची धारणा !!
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment