आभासी जग 

सोशल मेडियावर   माझा सतत वावर
घरच्यांच्या सुखदुखां:ची नसे मला खबर

रात्रंदिवस चाले माझे नेटवरून चाटिंग
वेळ नाही करायला सखेसोय-यांशी मीटिंग

मला आवडे करायला लाईक कॉमेंट
वेळेशी कामाशी नसे कोणतीही कमीटमेंट

रेडीमेड माहितीसाठी वापरतो मी गुगल
ज्ञानसाधनेस मारतो मी  बगल

निसर्ग-सौंदर्याशी माझे काय देण-घेण
हजारो चित्रांचे पाहतो एका क्लिकवर  येण-जाण

कानात असत्तात सतत इअर-फोन
ते सोडून दुसरे ऐकायला लागत नाही मन

सतत करतो काहीएक  अपलोड-डाऊनलोड
आई-बाबांशी बोलण्यास देतो काडीमोड

जगाशी साधतो मी एका क्षणात संपर्क
शेजा-यांशी बोलणे मानतो मी  भंपक

मित्रांशी कनेक्ट मी   थ्रू  ऑनलाईन
-ह्दयाची जुळतनाही पहिल्यासारखी लाईंन


वॉट्सअॅपच्या  ग्रुप  मध्ये असते माझेही नाव 
आपले इंप्रेशन त्याशिवाय  कसे पडणार राव 


फेसबुक, ट्विटर ,अॅप्स सारखे  सतत शब्द तोंडावर 
बायकोला माझ्या त्याचे कौतुक फार 


पोरगं लागलं करायला फारच   कीरकीर 
 मोबाईलवर गेम लावले की संपली फिकीर 
  
आभासी   जगात गेलो इतका मी गुंतून
वास्तव जगाशी गेलं  पुरत  नात  तुटून


© महेश भा.  रायखेलकर


Comments

Popular posts from this blog