अनाथालय

जसे फुलपाखरे चार भिंतीत कोंडले
असे या लेकरांनी काय पाप केले !

लहानपणीच यावे मोठ्यांचे शहाणपण
हरवुन गेले त्यातच यांचे बालपण!

त्यांनाही वाटत असेल कधी  बाहेर जावे
दंगामस्ती करत मुलांसोबत खेळावे!

का देवा देतोस यांना एवढी मोठी शिक्षा
बालपणीच त्यांची पाहतो कोणती परीक्षा!

नाही आईची माया आणि बापाचा आधार
जेथुन मिळतील तेथुन करून घ्यावे संस्कार!

नाही भावाची संगत आणि बहिणीची गंमत
एकमेकां आधार देवुन करावी सोबत !

 देवा ठेवु नको  यांना फार दिवस लहान
कर मोठे त्यांना लवकर चटकन !

घेतील भरारी होतील आधार
लहानपणी भोगलेले नाही विसरणार!

 प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देणार येणारा काळ!
आजच्या अंधारातुन फुटे  उद्याचा उष:काल!!
आजच्या अंधारातुन फुटे उद्याचा उष:काल  !!

© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog