पोलीस
रात्रंदिवस चाले माझा पहारा
नाही किहो मला कोणाचा सहारा
म्हणतात मला सर्वच पोलीस
सर्वांनीच ठेवलय मला ओलीस
तुम्ही साजरे करता सण-वार
बंदोबस्तासाठी असे मी वर्दीवर
माझ्या नशिबी सारेखच खुन-दरोडे
पाहुनी मन माझे झाले कोरडे
भावनेचे मला नसे देणे घेणे
घराचे करुनी ठेवलंय पोलीस-ठाणे
बायको घाबरे मला पाहून
पोरांशी बोलायचं जात राहून
दंग्याधोप्याचे टाळतो मी अरिष्ट
तरी म्हणे आम्ही आहोत भ्रष्ट
तेव्हा कोठे जातो तुमचा धर्म
जेव्हा आम्ही करतो चांगले काही कर्म
गुंडावर चाले माझी काठी
गुन्हेगारांच्या ऊरात बसे धडकी
जोपर्यंत अंगात माझ्या त्राण
देश रक्षणा देईल मी प्राण
तणावाने शरीर झाले त्रस्त
सर्वत्र चाले माझी गस्त
तुम्ही चाखता झोपेची साखर
बाहेर चाले माझा जागर
खाकी वर्दी मला असे प्रिय
कायद्याचे उलंघन मला अप्रिय
समाजाचा असे मी रक्षक
समाज विघांतकांसाठी मी भक्षक
समाज विघांतकांसाठी मी भक्षक
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment