धाव बा आता
पुंडलीका धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला
मात्या पित्याच्या सेवे साठी साक्क्षात पांडुरंगा  उभा केला
श्रावणा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला
अंध आई बापाला कावडीत घालूनी तीर्थांटना तु नेला
गणेशा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला
आई वडिलाना  प्रदिक्क्षना घालूनी कार्तिकेय  सोबत्तचा पण जिंकला
रामा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला
दशरथ पित्याच्या वचनासाठी वनवासा तू गेला
शिवबा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला
जिजाऊ मातेच्या स्वप्ना साठी स्वराज्याचा विडा उचलला

© महेश भा. रायखेलकर 



Comments

Popular posts from this blog